Haryana Assembly Election Result: भाजपच्या विजयामागे EVM बॅटरीचा काय संबंध? ''99 टक्के चार्जिंग असेल तर भाजपचा विजय'' काँग्रेसचे आरोप

Congress News: हरियानातील निकालाने केवळ काँग्रेसच्या नेत्यांसाठी आश्चर्यकारक राहिले नाही तर भाजपच्या नेत्यांना सुद्धा अनपेक्षित आहे. यामुळे हरियानाचा हा निकाल कधीही मान्य होऊ शकत नाही. हरियानात फिरल्यानंतर जनभावनेची प्रत्यक्ष माहिती मिळत होती. त्यामुळे हा कुणालाच स्वीकार्य राहू शकत नाही. काँग्रेसतर्फे हरियानातील १३ ते १४ मतदारसंघात झालेल्या गैरव्यवहाराबाबत निवडणूक आयोगाकडे दाद मागणार आहे.
evm file photo
evm file photo
Updated on

नवी दिल्ली: हरियानातील निवडणुकीचा निकाल लोकभावनेच्या विरोधात असून हा लोकशाहीचा पराभव असून तंत्राचा विजय असल्याचा आरोप काँग्रेसतर्फे करण्यात आला आहे. हरियानातील निकाल स्पष्ट झाल्यानंतर काँग्रेसचे सरचिटणीस खासदार जयराम रमेश व राष्ट्रीय प्रवक्ता पवन खेडा यांनी पत्रकार परिषद घेऊन या निकालाच्या संदर्भात निकालाच्या संदर्भात अनेक आक्षेप घेतले.

अनेक मतमोजणी केंद्रांमध्ये ईव्हीएम मशिनची बॅटरी ९९ टक्के होती. ही साधारणतः ६० ते ७० टक्के एवढी राहते. ज्या ईव्हीएमची बॅटरी ९९ टक्के होती त्या मशीनमधील निकाल भाजपच्या बाजूने लागले तर ज्या मशिनची बॅटरी ६० ते ७० टक्के होती. त्या मशीनमधील निकाल काँग्रेसच्या बाजूने लागले. हे होऊ शकत नाही. हरियानात डबल इंजिनचे सरकार असून या मतमोजणी करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर केंद्र व राज्य सरकारचा दबाव होता, हे स्पष्ट होत आहे.

हिस्सार, पानिपत व महेंद्रगड या जिल्ह्यातील मतदारसंघातील ईव्हीएममधील अनेक तांत्रिक त्रुटीच्या तक्रारी मिळाल्या आहेत. या संदर्भात संबंधित अधिकाऱ्यांकडे सकाळीच तक्रारही काँग्रेसच्या उमेदवारांनी दाखल केल्या आहेत. या तक्रारी अजूनही मिळत असून येत्या दोन-तीन दिवसात या तक्रारीबद्दल केंद्रीय निवडणूक आयोगाला निवेदन दिले जाणार असल्याचेही खासदार जयराम रमेश यांनी सांगितले.

हरियानातील निकालाने केवळ काँग्रेसच्या नेत्यांसाठी आश्चर्यकारक राहिले नाही तर भाजपच्या नेत्यांना सुद्धा अनपेक्षित आहे. यामुळे हरियानाचा हा निकाल कधीही मान्य होऊ शकत नाही. हरियानात फिरल्यानंतर जनभावनेची प्रत्यक्ष माहिती मिळत होती. त्यामुळे हा कुणालाच स्वीकार्य राहू शकत नाही. काँग्रेसतर्फे हरियानातील १३ ते १४ मतदारसंघात झालेल्या गैरव्यवहाराबाबत निवडणूक आयोगाकडे दाद मागणार आहे. या मतदारसंघातील निकाल फार कमी मतांनी बदलले आहेत. केंद्रीय निवडणूक आयोग ही स्वायत्त संस्था असून ही संस्था या हरकती व आक्षेपावर निश्चितपणे विचार करेल, असा विश्वास आहे. यानंतर पुढील कारवाईबद्दल विचार करण्यात येईल. न्यायालयात जाण्याचा पर्याय त्यानंतर उपलब्ध असल्याचेही ते म्हणाले.

शिवसेनेच्या आरोपावर मौन
काँग्रेस थेट भाजपशी असलेल्या लढतीमध्ये हारत असून केवळ सहकारी पक्षासोबत असताना काँग्रेसची कामगिरी चांगली असल्याच्या शिवसेना नेत्याच्या वक्तव्यावर खासदार जयराम रमेश यांनी प्रतिक्रिया देणे टाळले. महाराष्ट्रात काँग्रेसने सर्वाधिक जागांवर विजय संपादन केला आहे. ‘इंडिया’ आघाडीतील घटक पक्षांनी हे योग्य व्यासपीठावर मुद्दे उचलायला पाहिजे. असे मुद्दे माध्यमांमध्ये उचलणे योग्य नसल्याचे सांगून शिवसेना खासदाराच्या प्रतिक्रियेवर नाराजी व्यक्त केली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.