Haryana Chief Minister Announced Pension Scheme For Unmarried : हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांनी गुरुवारी अविवाहितांसाठी पेन्शन स्कीमची घोषणा केली आहे. या अंतर्गत ४५ ते ६० वयोगटातील अविवाहित महिला आणि पुरुषांना पेन्शन दिली जाईल. पण ही पेन्शन मिळवण्यासाठी काही अटी आहेत.
विधवा पेन्शन योजना
हरियाणा सरकारने नागरिकांसाठी काही योजना राबवल्या आहेत ज्यापैकी ही एक योजना असणार आहे. मुख्यमंत्री खट्टर यांनी या योजने व्यतिरीक्त ४० ते ६० वयोगटातील विधवांसाठीसुद्धा पेन्शन योजना सुरू केली आहे. या योजनेच्या लाभार्थी महिलांचे वार्षिक उत्पन्न ३ लाखांपेक्षा कमी असणे आवश्यक आहे. तेव्हाच त्यांना सरकारच्या या योजनेचा लाभ मिळेल. या विधवा पेन्शन योजने अंतर्गत महिलांना दरमहा २७५० रुपये पेन्शन मिळेल.
पोलिसांसाठी मोबइल अलाऊंस
जे लोक वयवर्ष ६० पुर्ण करतील ते वृद्ध पेन्शन योजनेचे लाभार्थी होऊ शकतात. यापूर्वी मुख्यमंत्र्यांनी हरियाणा पोलीस जवानांसाठी दरमहा मोबाइल अलाऊंस देण्याचीही घोषणा केली होती. ही घोषणा इंस्पेक्टर रँक पर्यंतच्या पोलिसांसाठी करण्यात आली आहे. यात काँस्टेबल आणि हेड काँस्टेबलला २०० रुपये, असिस्टंट सब इंस्पेक्टरला २५० रुपये, सब इंस्पेक्टरला ३०० रुपये आणि इंस्पेक्टरला ४०० रुपये अलाऊंस दिला जाईल.
अविवाहितांच्या पेन्शनच्या अटी
हरियाणातले हे लाभार्थी ४५ ते ६० वयोगटातील असावे.
ते अविवाहित असावे.
त्यांचे वार्षिक उत्पन्न १.८० लाख रुपये असावे.
लाभार्थींना दरमहा २७५० रुपये पेन्शन मिळेल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.