हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांना नागरिकांनी घेरव घालत त्यांना तब्बल चार तास घरात ओली ठेवल्याचा प्रकार समोर आला आहे. संपूर्ण गावाने एकत्र येऊन मुख्यमंत्र्यांना वेठीस धरल्याच्या या प्रकाराने एकच खळबळ उडाली आहे. नेमकं काय झालं?
घटनेबद्दल अधिकची माहिती अशी की, हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांचा महेंद्रगड जिल्ह्यात तीन दिवसांच्या जनसंवाद दौरा सुरू होता. या दौऱ्याचा शुक्रवारी शेवटचा दिवस होता. यादरम्यान मुख्यमंत्र्यांच्या या जनसंवाद कार्यक्रमात मोठा गोंधळ उडाल्याचे पाहायला मिळालं. खट्टर यांचा दौरा सीमहा गावात होता. यादरम्यान तेथील उपस्थित लोकांनी त्यांच्या गावाला उप तहसीलचा दर्जा देण्याची मागणी केली. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी देखील कार्यक्रमानंतर पत्रकार परिषद घेत गावाला उप तहसीलचा दर्जा देण्याची घोषणा केली.
मात्र या पत्रकार परिषदेतील घोषणेनंतर मुख्यमंत्री खट्टर हे दोंगडा या गावात राहाणार होते. मात्र सिहमा गावाला उप तहसीलचा दर्जा देण्याच्या घोषणेची माहिती दोंगडा गावातील लोकांना समजताच त्यांचा संताप अनावर झाला. या गावातील लोक रस्त्यावर उतरले. यासंतप्त झालेल्या ग्रामस्थांनी मुख्यमंत्र्यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी सुरू केली.
गावकऱ्यांनी मुख्यमंत्र्यांच्या स्वागत कार्यक्रमावर देखील बहिष्कार टाकला. संपूर्ण गाव महिला आणि लहान मुलांसह मुख्यमंत्री ज्या ठिकाणी राहाणार होते त्या घरासमोर एकत्र झाले. या घोषणाबाजी करणाऱ्या नागरिकांची पोलिसांनी समजावण्याचा प्रयत्न केला मात्र त्याचा काही प्रभाव पडला नाही.
यादरम्यान अटेलीचे आमदार सीताराम हे देखील घटनास्थळी पोहचले. त्यांनी देखील लोकांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला पण पण लोकांनी त्यांच्याविरोधात देखील घोषणाबाजी सुरू केली. त्यानंतरे माजी शिक्षणमंत्री रामविलास शर्मा घटनास्थळी आले. मात्र त्यांच्या विरोधात देखील घोषणाबाजी सुरूच राहीली.
गावातील नागरिक आक्रमक झाल्याने सकाळपर्यंत या परिसरात तणावाचे वातावरण होते. या वेळी संपूर्ण गावाला छावणीचे स्वरूप आले होते. गावकऱ्यांनी स्थानिक आमदारांना पळवून लावल्यावर ज्या घरात मुख्यमंत्री थांबले होते त्या घराला वेढा घातला. मुख्यमंत्री जिथे मुक्कामी होते तिथे संपूर्ण गाव जमा झाला. यामुळे सीएम खट्टर यांना तब्बल ४ तास नजरकैदेत राहावे लागले.
गावातील तणाव पाहून मोठे-मोठे आधिकारी,सीआयडी विभागाचे डीजीपी यांच्यासहीत अनेक सरकारी आधिकारी घटनास्थळी पोहचले. यादरम्यान मुख्यमंत्र्यांच्या सुरक्षेत काही चुक होऊ नये म्हणून अतिरिक्त पोलीसांना देखील घटनास्थळी पाचारण करण्यात आलं.
शेवटी परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे पाहून मुख्यमंत्र्यांनी प्रश्न सोडवण्यासाठी काही ग्रामस्थाना चर्चेसाठी आत बोलवलं. खूप वेळापर्यंत चर्चा झाल्यानंतर अखेर मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिलं की त्यांना परिस्थिती माहिती नव्हती, त्यानंतर त्यांनी त्यांचा निर्णय बदलून पुढील अटेली मंडी विधानसभा दौऱ्यावेळी सर्व्हे करून योग्य शहरास उप तहसील दर्जा देण्यात येईल अशी घोषणा केली. यानंतर ग्रामस्थानी मुख्यमंत्र्यांना त्यांच्या पुढील कार्यक्रमस्थळी जाऊ दिले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.