Ashok Tanwar: अवघड हाय समदं! कोण आहे 'तो' नेता? भाजपसाठी 2 वाजता प्रचार केला अन् 2:55 ला राहुल गांधींच्या उपस्थितीत मारली काँग्रेसमध्ये उडी

Ashok Tanwar Congress Haryana Election: अशोक तंवर यांनी याच वर्षी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यांनी भाजपच्या तिकिटावर लोकसभा निवडणूकही लढवली होती.
Ashok Tanwar rejoins Congress in presence of Rahul Gandhi, ahead of Haryana Assembly elections
Ashok Tanwar Rejoins Congress Esakal
Updated on

हरियाणा विधानसभा निवडणुकीच्या दरम्यान मोठी उलथापालथ झाली आहे. गुरुवारी भाजप नेते अशोक तंवर यांनी अचानक पलटी मारली अन् काही मनिटांत भाजपमधून काँग्रेसमध्ये उडी मारली.

दरम्यान अशोक तंवर यांनी काल दुपारी दोन वाजता भाजपच्या व्यासपीठावर पक्षाच्या उमेदवारांसाठी प्रचार केला होता. मात्र त्यानंतर काही मनिटांत इतक्या मोठ्या घडामोडी घडल्या की, तंवर यांनी 2:55 ला राहुल गांधी यांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश केला.

दरम्यान अशोक तंवर यांच्या या प्रवेशाची सध्या देशभरात चर्चा होता आहेत. इतकेच नव्हे तर अशोक तंवर यांनी गेल्या 5 वर्षांत 3 पक्ष बदलले आहेत.

अशोक तंवर यांनी याच वर्षी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यांनी भाजपच्या तिकिटावर लोकसभा निवडणूकही लढवली होती.

हरियाणा काँग्रेसचे माजी अध्यक्ष अशोक तंवर यांनी गुरुवारी पुन्हा एकदा काँग्रेसमध्ये प्रवेश केला. यापूर्वी त्यांनी आम आदमी पक्षातून 20 जानेवारी 2024 रोजी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला होता.

तंवर यांनी भाजपच्या तिकीटावर सिरसा लोकसभा मतदारसंघातून यंदा लोकसभा निवडणूक लढवली होती. निवडणुकीदरम्यान त्यांना भाजपच्या सिरसातील भाजपच्या नेत्यांच्या नाराजीला सामोरे जावे लागले होते. काँग्रेसच्या कुमारी शैलजा यांनी त्यांचा मोठ्या फरकाने पराभव केला होता.

भाजप उमेदवार अडचणीत

काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर अशोक तंवर यांच्या सिरसा येथील निवासस्थानावरून भाजपचे झेंडे आणि इतर प्रचार साहित्य हटवण्यात आले आहे.

विशेष म्हणजे त्यांनी सिरसा निवडणुकीत गोपाल कांडा यांना पाठिंबा दिला होता. गोपाल कांडा यांनी तंवर यांना लोकसभा निवडणुकीत पाठिंबा दिल्याचे ते म्हणाले होते. अशात परिस्थितीत निवडणूक प्रचार संपण्यापूर्वीच तंवर यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केल्याने सिरसाचे उमेदवार गोपाल कांडा यांच्या अडचणीत वाढ होणार आहे.

Ashok Tanwar rejoins Congress in presence of Rahul Gandhi, ahead of Haryana Assembly elections
'पतीपेक्षा दीर हँडसम, तोच सुंदर मुलगा देऊ शकेल म्हणून महिला घरातून पळाली, सासरच्यांनी गाठलं पोलीस स्टेशन

कोण आहेत अशोक तंवर?

अशोक तंवर हे मूळचे हरियाणातील झज्जर जिल्ह्यातील चिमणी गावचे आहेत. त्यांचा जन्म शेतकरी कुटुंबात झाला आहे. अशोक तंवर यांनी वारंगल येथील काकतिया विद्यापीठातून बीएचे शिक्षण घेतले आहे. अशोक तंवर यांचा राजकीय प्रवास जेएनयूमधून सुरू झाला. जेएनयूमधील विद्यार्थी संघटनेच्या अध्यक्षपदासाठी त्यांनी निवडणूक लढवली होती. तंवर 1999 मध्ये काँग्रेसची विद्यार्थी शाखा एनएसयूआयचे सचिव बनले. त्यानंतर 2003 मध्ये ते एनएसयूआयचे अध्यक्षही झाले. 2009 मध्ये अशोक तंवर यांनी सिरसा येथून काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढवली आणि साडेतीन लाखांहून अधिक मतांनी विजयी झाले. 2014 च्या लोकसभा निवडणुकीत ते काँग्रेसचे उमेदवार होते पण त्यामध्ये त्यांचा पराभव झाला होता.

Ashok Tanwar rejoins Congress in presence of Rahul Gandhi, ahead of Haryana Assembly elections
DY Chandrachud: "उद्या तुम्ही माझ्या घरी येणार अन् माझ्या पर्सनल..."; CJI चंद्रचूड वकिलावर का रागावले? सुप्रीम कोर्टात काय घडलं?

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.