Haryana INLD Leader Shot Dead: नफे सिंह राठींची गोळ्या घालून हत्या करणारे सीसीटीव्हीत कैद; कोण आहेत मारेकरी?

Haryana INLD Leader Shot Dead Marathi News: या हल्ल्यामध्ये याच पक्षाचा एक कार्यकर्ता देखील ठार झाला आहे.
Haryana INLD Leader Shot Dead Marathi News
Haryana INLD Leader Shot Dead Marathi News
Updated on

Haryana INLD Leader Shot Dead: हरयाणातील इंडियन नॅशनल लोक दल (INLD) नामक राजकीय पक्षाचे अध्यक्ष नफे सिंह राठी यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली आहे. या प्रकरामुळं हरयाणात खळबळ उडाली आहे.

हा हल्ला कोणी केला हे अद्याप कळू शकलेलं नाही. पण आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर झालेला हा हिंसाचर चिंतेत टाकणारा आहे. हे मारेकरी सीसीटीव्हीत कैद झाले आहेत. (haryana inld leader nafe singh rathee shot dead shower of 40 to 50 bullets on his car)

Haryana INLD Leader Shot Dead Marathi News
शिक्षणमंत्र्यांकडून नुसतेच आश्वासन! शिक्षकांना बीएलओ व मतदान ड्यूटी बंधनकारकच; शिक्षक कमी असल्याचा गुणवत्तेवर परिणाम, अनेक शाळा बंदच्या मार्गावर

पोलिसांच्या माहितीनुसार, हरयाणातील बहादुरगड इथं रविवारी हा प्रकार घडला. या हल्ल्यामध्ये याच पक्षाचा एक कार्यकर्ता जयकिशन हा देखील ठार झाला आहे. INLD चे नेते अभय चौटाला यांनी या दोघांच्या मृत्यूला दुजोरा दिला आहे. (Marathi Tajya Batmya)

Haryana INLD Leader Shot Dead Marathi News
Ind vs Eng Test Cricket : भारताला विजयासाठी हव्यात १५२ धावा ; अश्‍विन, कुलदीपचा प्रभावी मारा

हल्लेखोर एका ह्युंदाई i10 या कार मधून आले होते, त्यांनी राठी यांच्या कारवर एकामागून एक अनेक गोळ्यांचा वर्षाव केला. अचानक झालेल्या या बेछुट गोळीबारामुळं घटनास्थळी मोठा गोंधळ उडाला. यामध्ये अनेक सुरक्षा रक्षकही गंभीर जखमी झाले आहेत. (Latest Marathi News)

Haryana INLD Leader Shot Dead Marathi News
सोलापूर शहराच्या विस्तारात वाढ, तरी उत्पन्नात अपेक्षित वाढ नाही! २०० कोटींचा टॅक्स थकविणारे कोण? अजूनही ‘जीएसटी’ अनुदानातूनच पगारी

या हल्ल्याची सेन्ट्रल इंटेलिजन्स एजन्सी आणि एसटीएफद्वारे चौकशी सुरु करण्यात आली आहे, हल्लेखोर लवकरच ताब्यात घेतले जातील, असं झज्जरचे पोलीस आधीक्षक अर्पित जैन यांनी म्हटलं आहे. तर हरयाणातील राजकीय नेत्यांनी या हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध नोंदवला आहे. तसेच अभय चौटाला यांनी मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर आणि अनिल वीज यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.

Haryana INLD Leader Shot Dead Marathi News
Manoj Jarange : जरांगेंच्या आंदोलनामुळं पुन्हा तणाव; 'या' जिल्ह्यांमध्ये इंटरनेट आणि एसटी सेवा बंद!

हल्लेखोर सीसीटीव्हीत कैद

हल्लेखोर हे सीसीटीव्हीत कैद झाले आहेत. पण हे हल्लेखोर नेमके कोण आहेत? याबाबत खुलासा होऊ शकलेला नाही. याचा तपास केला जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.