Nuh Violence: नूह जिल्ह्यातील 'बुलडोझर' कारवाईला ब्रेक; तोडफोड थांबवण्याचे कोर्टाचे आदेश

Haryana Nuh Violence : हरियाणाच्या नूह जिल्ह्यात 31 जुलै रोजी हिंसाचार उफाळला होता. त्यानंतर राज्यात तोडफोड, जाळपोळीच्या घटना घडल्या.
A bulldozer
A bulldozer esakal
Updated on

Haryana Nuh Violence :

नवी दिल्ली- हरियाणाच्या नूह जिल्ह्यात 31 जुलै रोजी हिंसाचार उफाळला होता. त्यानंतर राज्यात तोडफोड, जाळपोळीच्या घटना घडल्या. राज्यात चार ते पाच दिवस तणावाची स्थिती होती. त्यानंतर हरियाणा सरकारकडून जिल्ह्यात अनेक ठिकाणांवर बुलडोझर चालवून कारवाई केली जात होती. सरकारकडून हिंसाचारातील आरोपींच्या अनधिकृत घरांवर बुलडोझर चालवला जात होता. याप्रकरणी पंजाब आणि हरियाणा हाय कोर्टाकडून ही कारवाई बंद करण्याचे आदेश प्रशासनाला मिळाले आहेत. त्यामुळे कथित आरोपींच्या घरांवर चालणारे बुलडोझर सध्या थांबणार आहेत.

नूह जिल्ह्यात हिंदू धर्मियांनी काढलेल्या मिरवणुकीवर दगडफेक करण्यात आली. त्यानंतर नूह जिल्ह्यासह इतर भागात हिंसाचार उफाळला. अनेक ठिकाणी तोडफोड, जाळपोळीच्या घटना समोर येऊ लागल्या. अनेकांना आपला जीव गमवावा लागला, यात पोलिस कर्मचाऱ्यांचाही समावेश होता. या प्रकरणात जवळपास दोनशे लोकांना अटक करण्यात आली आहे. हरियाणा सरकारने कारवाई म्हणून अनधिकृत घरांना पाडण्याचे काम सुरु केले. गेले चार दिवस ही कारवाई सुरु होती. अखेर कोर्टाने यावर बंदी आणली आहे.

A bulldozer
Pakistan: इम्रान खान यांच्यासह 5 माजी पंतप्रधान आतापर्यंत गेलेत तुरुंगात; अटकेची ‘पाक’ परंपरा

माहितीनुसार, आतापर्यंत 753 घर-दुकाने, हॉटेल, झोपड्या पाडण्यात आल्या आहेत. प्रशासनाने ही सर्व बांधकामे अनधिकृत असल्याचं म्हटलं आहे. तसेच यात राहणारे लोक नूह हिंसाचारात सहभागी होते असं त्याचं म्हणणं आहे. नूह जिल्ह्यात प्रशासनाने आतापर्यंत 37 ठिकाणी कारवाई करत 57.5 एकर जमीन रिकामी केली आहे. यात 162 स्थायी आणि 591 अस्थायी बांधकामांचा समावेश आहे. झोपडपट्ट्यांमध्ये बांगलादेशातील अनेक लोक बेकायदेशीरपणे राहत असल्याचे सांगण्यात येत आहे. यातील अनेक लोक हिंसाचारात सहभागी होते असा दावा आहे.

A bulldozer
Sambhaji Bhide: 'संभाजी भिडे यांचं नाव वगळा'; जनहित याचिकाकर्त्यांना हाय कोर्टाचे निर्देश

नूह शहरासह पुन्हाना, नगीना, फिरोजपूर, झिरका आणि पिंगवला भागातील अतिक्रमणे हटवण्यात आले आहे. 6 जुलै रोजी प्रशासनाने हिंसाचारादरम्यान ज्या हॉटेलवरुन दगडफेक केली होती ते पाडले होते. पोलिसांचा दावा आहे की हॉटेल मालकाला याची माहिती होती, तरी त्याने दंगलखोरांना छतावर दगडं ठेवण्याची परवानगी दिली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.