Haryana Politics BJP-JJP: हरियाणामध्ये काय आहे सत्तेचं गणित? चौटालांनी भाजपची सोडली साथ, अपक्ष आमदारांना 'लॉटरी'

Cracks in BJP JJP alliance: हरियाणाच्या राजकारणात आज भूकंप झाला आहे. मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांच्यासह संपूर्ण मंत्रीमंडळाने आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.
Haryana
HaryanaEsakal
Updated on

Haryana Politics: - हरियाणाच्या राजकारणात आज भूकंप झाला आहे. मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांच्यासह संपूर्ण मंत्रीमंडळाने आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. भाजप नेते आणि अपक्ष आमदारांमध्ये बैठक झाल्यानंतर मंत्रिमंडळाने राजभवनात जाऊन आपला राजीनामा सुपूर्द केला. अपक्ष आमदारांना सोबत घेऊनच भाजप नवे सरकार बनवणार आहे. जेजेपीचे सात आमदार देखील भाजपला समर्थन देऊ शकतात. (Haryana Politics CM Manohar Lal Khattar cabinet resign after cracks in BJP JJP alliance)

मनोहरलाल खट्टर यांच्या जागी दुसऱ्या नेत्याला मुख्यमंत्रीपदाची संधी दिली जाऊ शकते. सिंह सैनी आणि संजय भाटिया ही दोन नावे सध्या समोर येत आहेत. नायब सिंह सैनी सध्या भाजप प्रदेशाध्यक्ष आहेत. तसेत कुरुक्षेत्र लोकसभा मतदारसंघातून ते खासदार आहेत. नव्या सरकारमध्ये जननायक जनता पक्ष सहभागी होणार नाही. हरियाणामध्ये विधानसभेच्या एकूण ९० जागा आहेत. दुष्यंत चौटाला यांच्या जननायक जनता पक्षाशिवाय भाजप सरकार स्थापन करु शकते. माहितीनुसार, आजच भाजपच्या नेतृत्त्वातील सरकार स्थापन होईल.

Haryana
Ram Rahim : राम रहीमला वारंवार पॅरोल का मिळतो? हरियाणा सरकारने २०२२ मध्ये कायद्यात केले 'हे' बदल

हरियाणातील परिस्थिती जाणून घेऊया

हरियाणामध्ये मोठी उलथापालथ सुरु आहे. हरियाणाची विधानसभा ९० जागांची आहे. २०१९ च्या निधानसभा निवडणुकीत भाजपकडे ४१ आमदार होते. काँग्रेसच्या आमदारांची संख्या ३० होती, तर जेजेपीच्या आमदारांची संख्या १० आहे. अपक्ष आमदारांची संख्या ७ तर हरियाणा लोकहित पक्षाकडे एक जागा आहे. भाजपने दुष्यंत चौटाला यांच्या जेजेपीसोबत मिळून सत्ता स्थापन केली होती. आता जेजेपी सत्तेतून बाहेर पडली आहे. (Dushyant Chautala Haryana Politics Top updates)

भाजपकडे स्पष्ट बहुमत नाही, जेजेपीने साथ सोडल्याने भाजप अल्पमतात आली आहे. पण, यावेळी अपक्ष आमदार भाजपसोबत आहेत. या अपक्ष आमदारांना लॉटरी लागू शकते. अपक्ष आमदारांना मंत्रिमंडळात संधी मिळू शकते. मिळालेल्या माहितीनुसार, भाजपने प्रभारी बिप्लव देव यांच्यासह अनेक नेत्यांना चंदीगडमध्ये पाठवलं आहे.

Haryana
Haryana Political Crisis : लोकसभा निवडणुकीपूर्वी हरियाणामध्ये राजकीय भूकंप! मुख्यमंत्र्यांसह संपूर्ण मंत्रिमंडळाने दिला राजीनामा

आकड्यांचे गणित

४१ आमदार असलेल्या भाजपला सत्ता स्थापन करण्यासाठी पाच आमदारांची आवश्यकता आहे. सत्ता स्थापनेसाठी ४६ जागांची आवश्यकता आहे. माहितीनुसार, पाच अपक्ष आमदार भाजपला समर्थन देत आहेत. यात नीलोखेडी आमदार धर्मपाल गोंडर, प्रीथला आमदार नयन पाल रावत यांचा समावेश आहे. याशिवाय HLP चे गोपाल कांडा यांनी देखील भाजपला समर्थन दिले आहे.

जेजेपीमध्ये फूट

जेजेपीने भाजपची साथ सोडली असली तरी जेजेपीचे आमदार फुटण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मीडिया रिपोर्टनुसार, दुष्यंत चौटाला यांच्या पक्षांचा आमदारांसोबत भाजप नेते संपर्कात आहेत. दाव्यानुसार सात ते आठ आमदार भाजपसोबत येऊ शकतात. याबाबत अधिकृत कोणतीही माहिती नाही. (Latest Marathi News)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()