Haryana School Bus Accident: चालक नशेत धुंद, स्थानिकांनी अडवलं चावीही काढली पण...; 6 विद्यार्थांचा जीव घेणाऱ्या अपघातावेळी काय घडलं वाचा?

ईदची सुट्टी असतानाही ही शाळा कशी सुरु होती, याची चौकशी केली जात आहे.
Bus Accident
Bus AccidentEsakal
Updated on

नवी दिल्ली : हरयाणाच्या महेंद्रगड जिल्ह्यात गुरुवारी एका शाळेच्या बसला भीषण अपघात झाला, यामध्ये ६ विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला तर इतर २० जण जखमी झाले. या अपघातावेळी नेमकं काय घडलं? हे आता स्थानिकांच्या माहितीतून समोर आलं आहे.

स्कूलबसचा ड्रायव्हर हा दारुच्या नशेत धुंद होता, स्थानिकांनी त्याला अडवण्याचा, बसची चावीही काढण्याचा प्रयत्न केला पण शाळेच्या चुकीमुळेच हा अपघात घडला असा दावा प्रत्यक्षदर्शींनी केला आहे. (Haryana school bus accident locals tried to stop drunk driver before bus crash snatched his key)

Bus Accident
Sandeshkhali eMail: संदेशखाली प्रकरणी CBIनं तयार केला विशेष ईमेल; पीडितांना तक्रारी दाखल करण्याचं आवाहन

प्रत्यक्षदर्शी आणि स्थानिक नागरिकांच्या माहितीनुसार, शाळेच्या आवारातून जेव्हा ही बस निघणार होती तेव्हा बसचा ड्रायव्हर धर्मेंदर हा दारुच्या नशेत होता. त्यामुळं स्थानिकांनी त्याला रोखताना त्याच्या बसची चावीही काढून घेतली. पण शाळा प्रशासनानं ग्रामस्थांना चावी पुन्हा धर्मेंदरला देण्यास सांगितली तसेच पुढच्यावेळी नवा ड्रायव्हर पाठवू असं सांगितलं.

यानंतर बस काही अंतरावरच गेल्यानंतर ड्रायव्हरनं बसवरील नियंत्रण गमावलं आणि ही बस वेगानं बाजुच्या झाडावर जाऊन आदळली. या बसमधून ४० जीएल पब्लिक स्कूलचे ४० विद्यार्थी प्रवास करत होते. धडकेनंतर ही बस उलटली, त्यामुळं बसचा पार चक्काचूर झाला आणि त्यामुळं या बसमध्ये असलेल्या ६ चिमुकल्यांना आपले प्राण गमवावे लागले.

Bus Accident
Pakistan Police Clash With Pak Army: पाकिस्तानी लष्कराचा पंजाब पोलिस स्टेशनवर हल्ला, अनेकांना बेदम मारहाण, व्हिडिओ व्हायरल

दरम्यान, केवळ ग्रामस्थचं नव्हे तर काही पालकांनी देखील या ड्रायव्हरच्या दारु पिण्याच्या सवयीबद्दल शाळा प्रशासनाकडं तक्रार केली होती. पण तरीही शाळेनं ही बाब गांभीर्यानं न घेता त्याकडून साफ दुर्लक्ष केल्याचं समोर आलं आहे. (Marathi Tajya Batmya)

Bus Accident
Share Market Opening: शेअर बाजाराची घसरणीसह सुरुवात; सेन्सेक्स-निफ्टी अस्थिर, काय आहे कारण?

तिघांवर गुन्हा दाखल

याप्रकरणी तीन जणांना पोलिसांनी अटक केली आहे. यामध्ये ड्रायव्हर धर्मेंदरसह शाळेच्या मुख्याध्यापिका दिप्ती आणि एक अधिकारी होशियार सिंह यांचा समावेश आहे. पोलिसांनी सांगितलं की, अपघातस्थळावरुन धर्मेंदर याला ताब्यात घेण्यात आलं असून त्याच्या वैद्यकीय तपासणीत तो दारुच्या नशेत असल्याचं स्पष्ट झालं आहे. (Latest Marathi News)

Bus Accident
Sandeshkhali eMail: संदेशखाली प्रकरणी CBIनं तयार केला विशेष ईमेल; पीडितांना तक्रारी दाखल करण्याचं आवाहन

ईदच्या सुट्टीदिनीही शाळा कशी सुरु ठेवली?

दरम्यान, गुरुवारी देशभरात रमजान ईद निमित्त शाळांना सुट्टी होती. तरीही जीएल पब्लिक स्कूलनं शाळा सुरु ठेवल्यानं या शाळेवर संशयाचं वातावरण निर्माण झालं आहे. याप्रकरणी महेंद्रगडच्या उपायुक्त मोनिका गुप्ता यांनी जिल्हा शिक्षणाधिकाऱ्यांकडं प्रस्ताव पाठवला की, ईदची सुट्टी असतानाही ही शाळा सुरु ठेवल्यानं राज्य सरकारनं या शाळेची मान्यता रद्द करावी.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.