Hate Speech Case : एखाद्यानं हसून विधान केलं तर गुन्हा होत नाही - हायकोर्ट

अनुराग ठाकूर आणि परवेश वर्मा यांनी दिल्लीतील दंगलीवर केलेल्या द्वेषपूर्ण भाषणाविरोधातील खटल्यावर सुनावणी करताना दिल्ली हायकोर्टानं ही टिप्पणी केली आहे.
Delhi High Court
Delhi High CourtSakal
Updated on

नवी दिल्ली : "जर एखाद्यानं हसून एखादं विधान केलं तर ते गुन्हेगारी कृत्य नसतं", अशी महत्वाची टिप्पणी दिल्ली हायकोर्टानं (Delhi High Court) केली आहे. ईशान्य दिल्लीतील दंगलीशी संबंधीत हेटस्पीच प्रकरणात सुनावणी करताना हायकोर्टानं शुक्रवारी ही टिप्पणी केली. (Hate speech case If someone makes statement with smile it cannot be crime Delhi High Court)

Delhi High Court
पंतप्रधान गरीब कल्याण योजनेला मुदतवाढ; केंद्राचा मोठा निर्णय

"निवडणुकांच्या काळात केली गेलेली विधानं ही इतर वेळी केलेल्या विधानांपेक्षा वेगळी असतात. अशावेळी वातावरण निर्मितीसाठी काही विधानं केली जातात, ज्यामध्ये त्यांचा तसा हेतू नसतो. त्यामुळं जर एखाद्यानं हसून एखादं विधान केलं तर त्यामध्ये गुन्हेगारी कृत्य नसतं. पण जर यामध्ये काही आक्षेपार्ह विधान केलं गेलं तर मात्र ते गुन्हेगारी स्वरुपाचं असू शकतं," असं न्या. चंद्रधरी सिंह यांनी म्हटलं आहे.

सीपीआय नेत्या वृंदा करात यांनी कनिष्ठ कोर्टाच्या निर्णयाविरोधात दिल्ली हायकोर्टात अपिल केलं. या अपिलामध्ये वृंदा कारत यांनी केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर आणि खासदार परवेश वर्मा यांच्यावर द्वेषपूर्ण भाषण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. यावर सुनावणीदरम्यान कोर्टानं ही टिप्पणी केली.

खंडपीठानं म्हटलं की, "निवडणुकांदरम्यान केलेल्या विधानांवर जर अशा पद्धतीनं जर गुन्हे दाखल करायचे ठरले तर सर्व राजकारण्यांवर गुन्हे दाखल करावे लागतील. मला वाटतं सुमारे १००० एफआयआर या राजकारण्यांवर दाखल केले जातील. आपण लोकशाही देशात राहतो. इथं सर्वांना भाषण स्वातंत्र्य आहे. पण हे भाषण करतानाचा काळ काय होता आणि हे बोलण्यामागे त्यांची भावना काय होती हे देखील लक्षात घ्यायला हवं. निवडणुका जिंकण्यासाठी अशी भाषणं करणं आणि गुन्हा करण्यासाठी लोकांना उचकवण्यासाठी अशी भाषणं करणं या दोन भिन्न गोष्टी आहेत"

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()