Hathras Stamped: हाथरस दुर्घटनेचा तपास अहवाल SIT आज सरकारला सादर करणार, 100 हून अधिक जणांचे तपास अहवाल जबाब, काय कारवाई होणार?

Hathras Stamped: हाथरस दुर्घटनेची एसआयटी आज आपला तपास अहवाल सरकारला सादर करणार आहे. एडीजी आग्रा आणि अलिगड आयुक्तांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या तपासात डीएम-एसएसपीसह 132 लोकांचे जबाब घेतले जाणार आहेत.
Hathras Stamped
Hathras StampedEsakal

हाथरस सत्संग दुर्घटनेचा एसआयटी तपास अहवाल आज (शुक्रवारी) सरकारला सादर केला जाणार आहे. एडीजी आग्रा आणि अलिगड आयुक्तांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या तपासात डीएम-एसएसपीसह 132 लोकांचे जबाब घेतले जाणार आहेत. ज्यामध्ये साकार हरी भोले बाबा याचेही नाव आहे. पथकाकडून जबाब नोंदवण्याची प्रक्रिया काल (गुरुवारी) रात्रीपर्यंत सुरू करण्यात आली होती.

मंगळवारी झालेल्या दुर्घटनेनंतर सरकारने एडीजी आग्रा झोन अनुपम कुलश्रेष्ठ यांच्या अध्यक्षतेखाली एसआयटीची स्थापना केली होती. ज्यामध्ये विभागीय आयुक्त चैत्रा बी. यांचा देखील समावेश करण्यात आला होता. अपघातानंतर बुधवारी सकाळपर्यंत मदत आणि बचाव कार्य आणि त्यानंतर दुपारी मुख्यमंत्र्यांचा दौरा यामुळे एसआयटीच्या तपासाला गती मिळू शकली नाही.

Hathras Stamped
Hathras stampede: मृतांना जिवंत करण्याचा भोलेबाबाचा होता दावा, स्मशानभूमीत घातला होता गोंधळ! १९९८ मध्ये काय घडलं होतं?

मुख्यमंत्री योगी अदित्यनाथ यांनी दुर्घटना स्थळी भेट दिल्यानंतर तपास अधिक तीव्र झाला. सर्वप्रथम, मसुदा तयार करण्यात आला. कोणाचे जबाब नोंदवण्यात यावे या सर्वांची यादी तयार करून त्यांचे म्हणणे नोंदवण्याची वेळ निश्चित करण्यात आली. या सर्वांची पोलीस लाईनच्या आवारात चौकशी करण्यात येत आहे. गुरुवारी रात्रीपर्यंत 100 हून अधिक जणांचे जबाब नोंदवण्यात आले आहेत. एसआयटीचा तपास अहवाल शुक्रवारपर्यंत सरकारला सादर होण्याची शक्यता आहे. त्यानंतर या संपूर्ण घटनेत कोण दोषी आहे आणि कोणी निष्काळजीपणा दाखवला आहे, हे सरकारी पातळीवरून स्पष्ट होईल.

Hathras Stamped
Hathras Stampede: हाथरस दुर्घटनेनंतर पोलिसांची मोठी कारवाई! 20 जणांना अटक, मुख्य सेवेकऱ्यांचा शोध सुरू

दुर्घटना झाल्यापासून, पुरावे आणि घटना जाणून घेण्यासाठी टीम लोकांचे जबाब नोंदवत आहे. गुरुवारी वीज विभागाचे डॉक्टर, एक्सईएन, बीडीओ यांच्यासह अनेक विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना पाचारण करण्यात आले होते. ज्या लोकांची नावे यादीत समाविष्ट आहेत, त्यांना एसआयटी सतत नोटीस देऊन स्टेटमेंटसाठी बोलावत आहे.

त्यांचे जबाब नोंदवले जात आहेत. गुरुवारी, वीज विभागाचे XEN III, सिकंदराळचे ब्लॉक विकास अधिकारी, आरोग्य केंद्रात तैनात असलेले डॉक्टर आणि कर्मचारी आणि इतर विभागाच्या अधिकाऱ्यांना बोलावून त्यांचे जबाब नोंदवण्यात आले. सर्व विभागातून येणाऱ्या लोकांना आरआय कार्यालयात बसवण्यात आले. त्यानंतर एकामागून एक बोलावून त्यांचे जबाब नोंदवण्यात आले.

Hathras Stamped
Hathras Stampede: हाथरस दुर्घटना! 'तो' शेवटचा कॉल अन् बाबाचा मोबाईल झाला बंद; वाचा इनसाईड स्टोरी

बाबांचे जबाब कसे नोंदवले जाणार, हा मोठा प्रश्न आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हाथरस डीएम एसपी व्यतिरिक्त भोले बाबाचे नावही एसआयटीच्या तपास यादीत आहे. या सर्वांचे जबाबही नोंदवले जाणार आहेत. अशा परिस्थितीत ही टीम व्यक्तिश: जाऊन भोले बाबाला भेटणार की भोले बाबाला बोलवलं जाणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे. आतापर्यंत पोलिसांना भोले बाबाचा कोणताही सुगावा लागू शकलेला नाही. अशा स्थितीत बाबांचा जबाब कसा नोंदवला जाणार? याबाबत कोणाकडेही ठोस माहिती नाही.

एडीजी आग्रा झोन अनुपम कुलश्रेष्ठ यांनी सांगितले की, एसआयटीचा तपास सुरू आहे. त्यात अनेकांचे जबाब नोंदवण्यात आले आहेत. यापुढेही अनेकांचे जबाब नोंदवले जातील. आज (शुक्रवारी) सायंकाळपर्यंत तपास पूर्ण झाल्यानंतर अहवाल सरकारला पाठवला जाईल.

Hathras Stamped
Hathras Stampede: हाथरस दुर्घटनेत कटाचा संशय! मुख्यमंत्र्यांनी केली मोठी घोषणा, निवृत्त न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली होणार चौकशी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com