Hathras stampede: मृतांना जिवंत करण्याचा भोलेबाबाचा होता दावा, स्मशानभूमीत घातला होता गोंधळ! १९९८ मध्ये काय घडलं होतं?

Hathras stampede update in marathi: कर्करोगाने मरण पावलेल्या 16 वर्षीय मुलीचा समावेश होता आणि बाबाने दावा केला होत की तो तिला पुन्हा जिवंत करू शकतो.
Hathras stampede
Hathras stampedeesakal
Updated on

हाथरसमध्ये स्वयंघोषित भोले बाबाच्या सत्संग कार्यक्रमात मृत्यूतांडव झाला होता. 121 जणांचा चेंगराचेंगरीत मृत्यू झाला होता. यामध्ये सर्वाधिक महिला आणि मुलं होती. यानंतर बाबा फरार झाला. या बाबावर यापूर्वी देखील अनेक गुन्हे दाखल आहेत. मात्र लोकांना अंधश्रद्धेत ढकलून बाबा स्वत: झोळी भरत होता.  १९९८ मध्ये या ढोंगी बाबाला अटक झाली होती. यामध्ये त्याची पत्नी आणि इतर चार जणांचा समावेश होता. मृत मुलीला जिवंत करण्यासाठी " जादुई शक्ती " असल्याचा दावा या बाबाने केला होता.

शाहगंजचे एसएचओ तेजवीर सिंग (Station House Officer) यांनी सांगितले, या प्रकरणात कर्करोगाने मरण पावलेल्या 16 वर्षीय मुलीचा समावेश होता आणि बाबाने दावा केला होत की तो तिला पुन्हा जिवंत करू शकतो. एफआयआरमध्ये माहितीनुसार, बाबाविरुद्ध भारतीय दंड संहिता (IPC) कलम 109 कायद्याखाली गुन्हा दाखल करण्यात आला होता, कारण त्यांच्या अनुयायांनी स्मशानभूमीत गोंधळ घातला होता.

बाबाचे दावे आणि अनुयायांची प्रतिक्रिया

पंकज कुमार यांनी सांगितले की, बाबाने आपल्या भाचीला दत्तक घेतले होते, तिला नंतर कॅन्सर असल्याचे कळाले. एके दिवशी ती बेशुद्ध झाली तेव्हा बाबाने दावा केला की तो 'मृत मुलगी'ला जिवंत करू शकतात. ती मुलगी शुद्धीत आली, पण थोड्याच वेळात तिचा मृत्यू झाला.

स्मशानभूमीत गोंधळ

"सुरजपाल आणि इतर 200 हून अधिक लोकांनी स्मशानभूमीवर जाऊन मुलीच्या कुटुंबाला खात्री पटवण्याचा प्रयत्न केला की बाबा तिला जिवंत करू शकतात," असे सिंग यांनी सांगितले. अनुयायांनी जोरजबरदस्तीने मुलीच्या मृतदेह ताब्यात घेतला होता.

"आम्ही तिथे पोहचलो तेव्हा त्याने आणि त्याच्या समर्थकांनी आमच्यावर दगडफेक केली. आम्ही सुरजपाल, त्याची पत्नी आणि इतरांना अटक केली," असे तेजवीर सिंग यांनी टाइम्स ऑफ इंडियाला सांगितले.

Hathras stampede
Hathras Stampede: हाथरस दुर्घटनेनंतर पोलिसांची मोठी कारवाई! 20 जणांना अटक, मुख्य सेवेकऱ्यांचा शोध सुरू

एवढेच नाही तर कोरोनाच्या काळात सत्संग आयोजित केल्याने बाबा वादातही आले होते. यावेळी सुमारे 50 हजार लोक या कार्यक्रमात सहभागी झाले होते, त्यानंतर कार्यक्रमाबाबत प्रश्न उपस्थित करण्यात आले. एवढेच नाही तर बाबांचा आश्रमही खूप रहस्यमय आहे. 13 एकर जमिनीवर पसरलेला हा आश्रम एखाद्या किल्ल्यासारखा मजबूत आहे. बाबांच्या वैयक्तिक सुरक्षा रक्षकांमध्ये महिलांचाही समावेश आहे.

इतकंच नाही तर बाबांना मोठ्या आणि महागड्या गाड्यांचा शौक आहे, बाबांच्या ताफ्यात तीसहून अधिक मोठ्या आणि आलिशान गाड्या धावतात. बाबांसोबत महिला सुरक्षा कर्मचाऱ्यांचा एक गट, बाबा स्वत: त्यांच्या नोकर भरतीवर लक्ष ठेवतात.

Hathras stampede
Hathras Stampede: हाथरस दुर्घटना! 'तो' शेवटचा कॉल अन् बाबाचा मोबाईल झाला बंद; वाचा इनसाईड स्टोरी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.