Hathras Stampede: "देव आपल्याला..." हाथरस दुर्घटनेप्रकरणी भोले बाबा पहिल्यांदा कॅमेऱ्यासमोर; पाहा व्हिडिओ

Bhole Baba: हातरस येथे सत्संगादरम्यान झालेल्या चेंगराचेंगरीत 2 जुलै रोजी 121 जणांच्या मृत्यू झाला होता. प्रकरणातील फरार मुख्य आरोपी देवप्रकाश मधुकर याने दिल्लीत आत्मसमर्पण केले आहे.
Hathras Stampede Bhole Baba Video Statement
Hathras Stampede Bhole Baba Video StatementEsakal
Updated on

हाथरस येथे झालेल्या चेंगराचेंगरीनंतर सत्संगातील प्रमुख वक्ता भोले बाबा प्रथमच कॅमेऱ्यासमोर आला आहे. 'भोले बाबा' म्हणून ओळखला जाणारा सूरजपाल एका व्हिडिओच्या माध्यमातून म्हणत आहे की, "२ जुलैच्या घटनेनंतर मला खूप दु:ख झाले आहे. देव आपल्याला हे दुःख सहन करण्याची शक्ती देवो. मला विश्वास आहे की अराजकता निर्माण करणाऱ्या कोणालाही सोडले जाणार नाही. माझे वकील एपी सिंग यांच्या माध्यमातून मी कत्संगाच्या आयोजकांच्या समिती सदस्यांना शोकग्रस्त कुटुंबियांच्या पाठीशी उभे राहून त्यांना आयुष्यभर मदत करण्याची विनंती केली आहे."

दरम्यान, हातरस येथे सत्संगादरम्यान झालेल्या चेंगराचेंगरीत 2 जुलै रोजी 121 जणांच्या मृत्यू झाला होता. प्रकरणातील फरार मुख्य आरोपी देवप्रकाश मधुकर याने दिल्लीत आत्मसमर्पण केले आहे.

Hathras Stampede Bhole Baba Video Statement
Dhirubhai Ambani Story: धीरूभाई अंबानींनी माती विकून असे कमावले होते पैसे, IPO आधी 3 वेळा बदलले होते रिलायन्सचे नाव

हाथरस जिल्ह्यातील फुलराई गावात त्याच्या सत्संगात घडलेल्या घटनेची चौकशी करण्यासाठी अधिकारी सूरजपाल उर्फ ​​नारायण साकार हरी उर्फ ​​भोले बाबा याला शोधत असताना त्यांचा व्हिडिओ विधान आला आहे.

या चेंगराचेंगरी प्रकरणातील मुख्य आरोपी देवप्रकाश मधुकर याला उत्तर प्रदेश पोलिसांनी दिल्लीत आत्मसमर्पण केल्यानंतर ताब्यात घेतले आहे, असा दावा त्याच्या वकिलाने शुक्रवारी रात्री केला. गुरुवारपर्यंत या प्रकरणी भोलेबाबांच्या सत्संगाच्या आयोजन समितीच्या सदस्य असलेल्या दोन महिला स्वयंसेविकांसह सहा जणांना अटक करण्यात आली होती. हातरस येथील सिकंदरराव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Hathras Stampede Bhole Baba Video Statement
Hathras stampede: हाथरस प्रकरणातील मुख्य आरोपीला अखेर अटक; 121 जणांचा गेला होता जीव

वास्तविक, हाथरस दुर्घटनेनंतर भोले बाबा बेपत्ता होता. या भीषण अपघाताच्या ४ दिवसांनंतर सूरज पाल पहिल्यांदाच मीडियासमोर आला आहे. मात्र, अपघातानंतर सुमारे 30 तासांनी बाबाचे लेखी निवेदन समोर आले होते. ज्यात त्याने मृतांप्रती शोक व्यक्त केला होता.

या प्रकरणातील मुख्य आरोपी देव प्रकाश मधुकर याला शुक्रवारी रात्री उशिरा यूपी एसटीएफने अटक केली. मधुकरवर एक लाख रुपयांचे बक्षीस होते. अपघातानंतर मधुकर फरार होता. दरम्यान, उत्तर प्रदेश सरकारच्या एसआयटीने आतापर्यंत 90 जणांचे जबाब नोंदवले आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.