Hathras stampede: चेंगराचेंगरीनंतर फरार झालेल्या भोले बाबाचा पत्ता अखेर सापडला

Bhole Baba: अपघातानंतर फरार झालेल्या बाबाचा सुगावा मंगळवारी रात्री उशिरा लागला. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अपघातानंतर बाबा नारायण साकार हरी उर्फ ​​भोले बाबा मैनपुरी येथील त्यांच्या निवासस्थानी पोहोचला होता.
Hathras stampede Bhole Baba 2024
Hathras stampede Bhole Baba 2024Esakal
Updated on

उत्तर प्रदेशातील हाथरस येथे सत्संगादरम्यान झालेल्या चेंगराचेंगरीत आतापर्यंत 122 जणांचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले आहे, तर 18 जण जखमी झाले आहेत.

अपघातानंतर फरार झालेल्या बाबाचा सुगावा मंगळवारी रात्री उशिरा लागला. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अपघातानंतर बाबा नारायण साकार हरी उर्फ ​​भोले बाबा मैनपुरी येथील त्यांच्या निवासस्थानी पोहोचला होता.

मैनपुरी पोलीस ठाण्याच्या बिचवान भागातील हरिनगरमध्ये बाबांचे मुक्कामाचे ठिकाण आहे. आश्रमाबाहेर पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. आश्रमात बाबाचे भक्तही मोठ्या संख्येने आहेत.

हातरसमध्ये सत्संगाचे आयोजन करणाऱ्या 'भोले बाबा'च्या पोलिसांनी मैनपुरी जिल्ह्यातील राम कुटीर चॅरिटेबल ट्रस्टमध्ये शोध मोहीम सुरू केली. सत्संगाचे आयोजन करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Hathras stampede Bhole Baba 2024
Hathras stampede: सातारा ते जोधपूर... देशातील अशा घटना जिथे चेंगराचेंगरीमुळे गमावले शेकडो भाविकांनी प्राण

मिळालेल्या माहितीनुसार, मैनपुरीच्या राम कुटीर आश्रमात प्रवेश करण्यापासून बाहेरून येणाऱ्या लोकांना पूर्णपणे रोखण्यात आले आहे. राम कुटीर आश्रमात बाहेरून आलेल्यांना भोले बाबाला भेटू दिले जात नाही. भोले बाबा 2 ते 3 वाजण्याच्या दरम्यान आश्रमात पोहोचला पण बाहेर तैनात असलेल्या एकाही सुरक्षा कर्मचाऱ्याने त्याला आश्रमात जाताना पाहिले नाही.

बाबावर लैंगिक शोषण आणि इतर गंभीर गुन्हे

स्वयंभू संत भोले बाबा आपल्या भक्तांबद्दल अनेक दावे करतात. बाबा कासगंजच्या पटियाली गावचा रहिवासी आहे.

उत्तर प्रदेश पोलिसात १८ वर्षांच्या सेवेनंतर त्याने व्हीआरएस घेतले होते. बाबाचा दावा आहे की व्हीआरएस नंतर त्याला देवाचे वैयक्तिक दर्शन झाले होते.

Hathras stampede Bhole Baba 2024
Narendra Modi : आर्थिक अराजकतेसाठी काँग्रेस प्रयत्नशील;लोकसभेत मोदींचा घणाघात

उत्तर प्रदेशातील हाथरसमध्ये झालेल्या चेंगराचेंगरीत आतापर्यंत 122 जणांचा मृत्यू झाला आहे. या मोठ्या अपघाताकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागून आहे. दरम्यान, अपघातात जीव गमावलेल्या 16 वर्षीय मुलीच्या आईने त्याठिकाणी घडलेला प्रसंग सांगितला.

पीडितेच्या आईने काय सांगितले?

हातरस चेंगराचेंगरीत ठार झालेल्या 16 वर्षीय मुलीची आई कमला म्हणाली, 'गेल्या 20 वर्षांपासून आम्ही सत्संगाला जात आहोत आणि अशी घटना कधीच घडली नाही. परमात्मा (भोले बाबा) दुपारी २ ते अडीचच्या सुमारास निघून गेले आणि त्यानंतर ही घटना घडली.

कमला म्हणाली, 'मी माझी मुलगी गमावली. माझी मुलगी हॉस्पिटलमध्ये असताना बरी होती. त्यांनी फोन करून या प्रकरणाची माहिती दिली. आम्ही हॉस्पिटलमध्ये पोहोचलो तोपर्यंत ती हॉस्पिटलमध्येच होती. पण नंतर तिला मृत घोषित करण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.