नवी दिल्ली- कथित लैगिंक गुन्ह्याप्रकरणी प्रज्वल रेवण्णा हा फरार आहे. याप्रकरणी देशाचे माजी पंतप्रधान एचडी देवेगौडा यांनी पहिल्यांदाच मौन सोडलं आहे. या प्रकरणी सर्वांविरोधात कारवाई व्हायला हवी, असं ते म्हणाले आहेत. यात आणखी काही लोकांना समावेश असल्याचे संकेत त्यांनी दिले आहेत. 'हिंदूस्तान टाईम्स'ने यासंदर्भात वृत्त दिलं आहे.
प्रज्वल रेवण्णा हा माजी पंतप्रधान एचडी देवेगौडा यांचा नातू आहे. एचडी देवेगौडा यांनी ९१ व्या वाढदिवशी ही प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, 'या प्रकरणामध्ये सहभागी असलेल्या सर्वांविरोधात कारवाई करायला हवी. मी कोणाची नावं घेणार नाही.' हासनचा खासदार प्रज्वल रेवण्णा हा जर्मनीमध्ये असल्याचं सांगितलं जातं.
प्रज्वल याच्या विरोधात कारवाई केली जाईल. पण, एचडी रेवण्णा यांच्या प्रकरणी काय झालं आपण पाहिलं आहे. त्यांना कोर्टाने जामीन मंजूर केला आहे. त्यांच्या प्रकरणी एक ऑर्डर पेंडिंगमध्ये आहे, असं देवेगौडा म्हणाले. रेवण्णा यांना महिन्याच्या सुरुवातीला कर्नाटक पोलिसांनी अटक केली होती. एका महिलेचे अपहरण केल्याचा आरोप रेवण्णा यांच्यावर पोलिसांनी लावला होता.
पीडितांना भरपाई मिळावी अशी मागणी माजी मुख्यमंत्री कुमारस्वामी यांनी लावून धरली आहे. सध्याच्या वादामुळे एचडी देवेगौडा यांनी आपला वाढदिवस उत्सवात साजरा करण्याचे टाळले आहे. प्रज्वल प्रकरणी कर्नाटक पोलिसांचे विशेष तपास पथक Special Investigation Team (SIT) तपास करत आहे. कर्नाटकमध्ये काँग्रेसचे सरकार आहे. त्यामुळे या मुद्द्यावरुन भाजपसोबत असलेल्या जनता दल धर्मनिरपेक्ष आणि काँग्रेसमध्ये चांगलाच कलगितुरा रंगला आहे.
काही दिवसांपूर्वी प्रज्वल रेवण्णा याच्या संदर्भात काही अश्लील व्हिडिओ व्हायरल झाले होते. प्रज्वल याने अनेक महिलांवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप केला जातो. जेव्हा हे व्हिडिओ बाहेर आले तेव्हापासून प्रज्वल फरार आहे. एसआयटीने त्याच्याविरोधात रेड कॉर्नर नोटीस काढली आहे. अनेक महिलांनी प्रज्वल विरोधात पोलिसात तक्रार दाखल केली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.