HD Kumaraswamy: पत्रकार परिषद सुरू होती अन् माजी मुख्यमंत्र्याच्या नाकाला अचानक लागली रक्ताची धार; पाहा व्हिडिओ

Viral Video: विजयेंद्र यांनी राज्यातील काँग्रेस सरकारवर सडकून टीका केली. राज्यातील काँग्रेस सरकारने आदिवासी समाजाची लूट केली असल्याचा आरोप त्यांनी केला.
HD Kumaraswamy Viral Video
HD Kumaraswamy Viral VideoEsakal
Updated on

केंद्रीय मंत्री एचडी कुमारस्वामी यांना नाकातून रक्तस्त्राव झाल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

रविवारी बेंगळुरूमध्ये भाजप-जेडीएस नेत्यांच्या बैठकीनंतर कुमारस्वामी पत्रकार परिषदेत बोलत होते. त्यावेळी अचानक त्यांच्या नाकातून रक्त येऊ लागले. त्यानंतर त्यांचा शर्ट रक्ताने माखलेला होता. त्याला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले.

पत्रकार परिषदेदरम्यान कुमारस्वामी कपड्याच्या तुकड्याने नाक झाकण्याचा प्रयत्न करताना दिसले. यावेळी त्यांचा शर्टही रक्ताने माखला होता. मात्र, हे का घडले याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. त्यांना रुग्णालयात नेण्यात आले आहे. डॉक्टर त्यांची तपासणी करत आहेत.

HD Kumaraswamy Viral Video
DY Chandrachud: मनमानी पद्धतीने अटक, जामीन याचिकांना विलंब, कॉमन सेन्सचा वापर करा; CJI चंद्रचूड यांचा न्यायाधिशांना सल्ला!

पत्रकार परिषदेपूर्वी प्रदेश भाजप अध्यक्ष बीवाय विजयेंद्र, कुमारस्वामी आणि राज्याचे विरोधी पक्षनेते आर अशोक यांच्या नेतृत्वाखाली भाजप-जेडीएस नेत्यांची बैठक झाली. यादरम्यान कर्नाटकातील म्हैसूर अर्बन डेव्हलपमेंट अथॉरिटी (मुडा) घोटाळ्यासह इतर अनेक भ्रष्टाचाराच्या प्रकरणांची चर्चा झाली.

HD Kumaraswamy Viral Video
नेताजींच्या अस्थी परदेशात असणं अपमानास्पद बाब; सुभाषचंद्र बोस यांच्या नातवाने PM मोदींना लिहीलं पत्र, केली मोठी मागणी

बैठकीनंतर विजयेंद्र यांनी राज्यातील काँग्रेस सरकारवर सडकून टीका केली. राज्यातील काँग्रेस सरकारने आदिवासी समाजाची लूट केली असल्याचा आरोप त्यांनी केला. ते पुढे म्हणाले की, दोन्ही पक्षांनी ३ ऑगस्टपासून पदयात्रा काढण्याचा निर्णय घेतला आहे. बीएस येडियुरप्पा आणि एचडी कुमारस्वामी या यात्रेत सहभागी होणार आहेत.

ही सात दिवसांची यात्रा असून ती 3 ऑगस्टला सुरू होऊन 10 ऑगस्टला संपेल. 10 ऑगस्टला भाजपचे राष्ट्रीय नेतेही उपस्थित राहणार आहेत. सरकारने आमचा मोर्चा रोखण्याचा प्रयत्न केला तरी आम्ही थांबणार नाही, असेही ते म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.