MP Urination case: CM चौहान यांनी 'त्या' आदिवासी व्यक्तीचे पाय धुतल्यानं सुटणार आरोपी!

आरोपी प्रवेश शुक्ला या भाजप कार्यकर्त्यानं पीडित आदिवासी व्यक्तीवर लघुशंका केली होती.
Shivraj Singh Chauhan
Shivraj Singh Chauhan
Updated on

भोपाळ : प्रवेश शुक्ला या भाजपच्या कार्यकर्त्यानं एका आदिवासी व्यक्तीवर लघुशंका करण्याचा अमानुष प्रकार नुकताच समोर आला होता. मध्य प्रदेशात ही घटना घडली होती, या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाल्यानंतर देशभरातून मोठ्या प्रमाणावर टीका झाली होती. त्यानंतर पोलिसांनी आरोपीला अटक केली. पण आता या घटनेतील पीडित आदिवासी व्यक्तीनं तक्रार मागे घेणार असल्याचं म्हटलं असून आरोपीला मुक्त करण्यात यावं अशी इच्छा व्यक्त केली आहे. (He has realised his mistake Urination case victim wants accused man released)

Shivraj Singh Chauhan
भाजप कार्यकर्त्याकडून आदिवासी तरुणाच्या अंगावर लघुशंका; माणुसकीला काळीमा फासणारी घटना

दशमत रावत असं या घटनेतील पीडित आदिवासी व्यक्तीचं नाव आहे. हा व्यक्ती फुटपाथवर बसलेला असताना त्याच्या डोक्यावर प्रवेश शुक्ला या भाजपच्या कार्यकर्त्यानं लघवी केली होती. हा प्रकार घडत असताना पीडित व्यक्ती जागेवरुन हालला देखील नाही, कारण शुक्लासारख्या गुंड प्रवृत्तीच्या तरुणाचा त्याच्यावर दबाव होता. या संपूर्ण घटनेचं मोबाईलमध्ये एकानं चित्रिकरण केलं, हीच व्हिडिओ क्लीप सोशल मीडियात व्हायरल झाली आहे. (Latest Marathi News)

Shivraj Singh Chauhan
Sidhi Pee Case Video Viral : लघुशंका प्रकरणी तक्रार द्यायला गेलेले काँग्रेस नेते आपापसांत भिडले; चप्पल, लाथाबुक्क्याने मारहाण

ही क्लीप समोर आल्यानंतर भाजपवर जोरदार टीका सुरु झाली. माध्यमांनी देखील या अमानुष वागणुकीचं प्रकरण लावून धरलं. मोठ्या प्रमाणावर टीका होऊ लागल्यानं मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी पीडित आदिवासी व्यक्तीला आपल्या निवासस्थानी बोलावून त्याचे पाय धुतले आणि त्याचा सत्कारही केला, याचे फोटोही त्यांनी आपल्या ट्विटर हँडलवरुन शेअर करत "मन दुःखी झालंय, दशमतजी आपलं दुःख वाटण्याचा हा प्रयत्न आहे. मी तुमची माफी देखील मागतो, माझ्यासाठी जनताच देव आहे" असंही त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे. या प्रकरणाचा फटका भाजपला येत्या काही महिन्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत बसण्याची शक्यता आहे. (Marathi Tajya Batmya)

Shivraj Singh Chauhan
Sidhi Pee Case : लघुशंका प्रकरणातील पीडित आदिवासी तरुणाचे मुख्यमंत्र्यांनी धुतले पाय; निवासस्थानी बोलवून केला सन्मान!

खुद्द राज्याच्या मुख्यमंत्र्यांनीच पाय धुतल्यानं शेवटी पीडित दशमत रावत यांनी सरकारकडे आरोपी प्रवेश शुक्ला याला सोडून देण्याची विनंती केली आहे. शुक्लाला त्याची चूक उमगली आहे, त्यामुळं त्याला दया दाखवावी, शुक्ला हा आमच्या गावचा पंडीत आहे त्यामुळं त्याला सोडून द्यावं, असं पीडित व्यक्तीनं शुक्रवारी पत्रकारांशी बोलताना सांगितलं.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.