पाटणा- बिहारमधील समस्तीपूरमधील एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये एक प्रेमी आपल्या प्रेयसीला खांद्यावर घेऊन पळून जात असल्याचं दिसत आहे. हा प्रकार पाहून अनेकजण आश्चर्यचकित झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, दोघांची ओळख इंस्टाग्रामवर झाली होती. त्यानंतर त्याचे रुपांतर प्रेमात झाले. (He started running with his girlfriend on his shoulder police came The video went viral in bihar samastipur)
छपरा जिल्ह्यात राहणाऱ्या एका जवानाची समस्तीपूरमध्ये राहणाऱ्या एका मुलीशी इंस्टाग्रामवर ओळख झाली. इंस्टाग्रामवर ते एकमेकांशी बोलू लागले. काही महिने त्यांचे हे बोलणं सुरु होते. त्यानंतर त्यांनी आपला मोबाईल क्रमांक एकमेकांना दिला. फोनवर त्यांचे बोलणे सुरु झाले. मैत्रीचे रुपातंर त्यांनंतर प्रेमात झाले. व्हिडिओ कॉलिंग आणि एकमेकांना ते भेटायला देखील लागले.
माहितीनुसार, एकवर्ष त्यांचे हे प्रेम प्रकरण सुरळीत सुरु होतं. पण, त्यानंतर प्रेयसीने प्रियकरापासून दूर राहण्यास सुरुवात केली. त्यामुळे प्रियकर रागावला होता. प्रियकराने बहाणा करुन प्रेयसीला थानेश्वर येथील मंदिरात भेटायला बोलावलं. त्यांच्या दोघांचे बोलणे सुरु होते. त्याचवेळी प्रेयसीची आई आणि बहिण त्याठिकाणी आले. यावेळी त्यांच्यात वाद झाला. यावेळी प्रियकर प्रेयसीला खांद्यावर घेऊन पळू लागला.
प्रेयसीला सोबत घेऊन जाण्यास प्रियकर अडून बसला होता. यावरुन आई आणि प्रियकरामध्ये वाद सुरु झाला. प्रेयसी देखील प्रियकरासोबत जाण्यास तयार नव्हती. मात्र, प्रियकर तिला सोबत येण्यासाठी जबरदस्ती करु लागला. हा सगळा प्रकार सुरु असताना एका वाटसरुने याचा व्हिडिओ कैद केला.
प्रियकरांने प्रेयसीला खांद्यावर घेऊन पळण्यास सुरुवात केली. पण, तितक्यात पोलीस त्याठिकाणी आले. पोलिसांना पाहून तरुण घाबरला आणि तेथून त्याने पलायन केले. माहितीनुसार, प्रेयसीच्या कुटुंबियांकडून यासंदर्भात पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आलेली नाही. त्यामुळे पोलिसांनी कोणतीही कारवाई केलेली नाही. (Latest Marathi News)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.