बुरखा तोंडावरुन हटव, तुझा सुंदर चेहरा..; मुस्लीम महिलेविषयी असभ्य टिप्पणी करणाऱ्या पोलिसाचे निलंबन

head constable suspended for making lewd comments: महिलेची स्कूटर चोरी झालेली होती. त्यामुळे महिलेने पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली होती. यासंदर्भातील अपडेट जाणून घेण्यासाठी ती आली होती.
muslim women
muslim women
Updated on

चेन्नई- तमिळनाडूच्या चेन्नईमध्ये एका मुस्लिम महिलेशी असभ्य बोलल्याप्रकरणी एका हेड कॉन्स्टेबलला निलंबित करण्यात आले आहे. पोलीस अधिकाऱ्याने महिलेशी बोलताना चुकीच्या शब्दांचा प्रयोग केल्याचं सांगण्यात येत आहे.

पोलिसाने महिलेला बुरखा तोंडावरुन हटवण्यास सांगितलं. तसेच तुझा सुंदर चेहरा नीट दिसत नाहीये. त्यामुळे बुरखा हटव असं पोलिसाने महिलेला म्हटल्याचा आरोप आहे. (head constable suspended for making lewd comments to a muslim woman when she had come to the police station)

हिंदूस्तान टाईम्सने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे. रिपोर्टनुसार, महिला पोलीस स्टेशनमध्ये काही कामासाठी गेली होती. त्यावेळी तिच्याशी अशी वर्तवणूक करण्यात आली आहे. महिलेची स्कूटर चोरी झालेली होती. त्यामुळे महिलेने पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली होती. यासंदर्भातील अपडेट जाणून घेण्यासाठी ती आली होती.

muslim women
Hyderabad Women: लग्नाला नकार दिला म्हणून तिने टीव्ही अँकरचे केले अपहरण; हैद्राबादमधील उद्योजिकेला अटक

१४ फेब्रुवारीला या महिलेची स्कूटर चोरी झाली होती. त्यानंतर महिलेने पोलीस स्टेशनमध्ये एफआयआर दाखल केला. पोलिसांनी तक्रार दाखल करुन घेतली होती. पोलिसांनी याप्रकरणी तपास करुन गाडी मिळवली होती. माहितीनुसार, जेव्हा फातिमा स्टेशनमध्ये आली तेव्हा हेड कॉन्स्टेबलशी तिचे बोलणे झाले.

हेड कॉन्स्टेबलने फातिमाला सांगितलं की, तुला स्कूटर हवा असेल तर तुला कोर्टात जावं लागेल. हे ऐकून फातिमा काहीशी हैराण झाली आणि रडू लागली. यावर हेड कॉन्स्टेबल तिला म्हणाला की, तू रडताना खूप चांगलं वाटत आहेत. एक काम करत तू आपल्या चेहऱ्यावरचा बुरखा देखील हटव, मला तुझा सुंदर चेहरा पाहू दे.

muslim women
Crime News: झोपलेल्या पत्नीच्या चेहऱ्यावर पतीने ओतले ॲसिड; कारण ऐकून बसेल धक्का

पोलीस अधिकाऱ्याने केलेल्या अशा असभ्य टिप्पणीमुळे फातिमाला धक्काच बसला. तिने त्यानतर हेड कॉन्स्टेबल विरोधात तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी तपास सुरु केला. प्राथमिक तपासानंतर हेड कॉन्स्टेबलला निलंबित करण्यात आले आहे. या प्रकारावरुन सोशल मीडियावर देखील जोरदार चर्चा सुरु आहे.

अनेकांनी या प्रकारानंतर तीव्र प्रतिक्रिया दिल्या आहेत. एक पोलीस अधिकारीच जर असं म्हणत असेल तर लोकांनी कुणाकडे जावं. ज्यांच्याकडे आपल्या रक्षणाची जबाबदारी आहे असेच लोक जर पोलीस स्टेशनमध्ये एका महिलेशी असे वागणार असतील तर कसं होईल. पोलीस अधिकाऱ्यावर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात येत आहे. (Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.