महाराष्ट्रातून गेलेल्या व्यक्तीचा मृतदेह खाल्ला उंदरांनी...

health department negligence laborer insects mice at uttar pradesh
health department negligence laborer insects mice at uttar pradesh
Updated on

लखनौ (उत्तर प्रदेश): लॉकडाऊनदरम्यान एक व्यक्ती महाराष्ट्रातून उत्तर प्रदेशातील ललितपूर येथे पोहचली. पण, अचानक तब्बेत बिघडल्यामुळे रुग्णालयात दाखल करावे लागले. उपचारादरम्यान मृत्यू झाला. पण, मृतदेह उंदीर आणि मुंग्यांनी खाल्ल्याची धक्कादायक घटना घडली आहे. नसीमुद्दीन (वय 58) असे मृत मजुराचे नाव आहे.

प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, 'नसीमुद्दीन हे महाराष्ट्रातून ललितपूर जिल्ह्यात पोहचले. पण, अचानक तब्येत बिघडल्यामुळे उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. संशयास्पद परिस्थितीत मृत्यू झाल्यानंतर जिल्हा आरोग्य विभागाने मृतदेह ताब्यात घेऊन जिल्हा रुग्णालयाच्या शवगृहामध्ये ठेवला. मजुराची कोरोना चाचणीही करण्यात आली होती. कोरोना चाचणीचा अहवाल निगेटिव्ह आल्यावर रुग्णालय प्रशासनाने मृताच्या नातेवाईकांना मृतदेह घेऊन जाण्यास सांगितले. पण, नातेवाईकांनी मृतदेह पाहिल्यावर त्यांना धक्काच बसला. मृतदेह पूर्णपणे कुजला होता. शरीर उंदीर आणि मुंग्यांनी खाल्ले होते. यामुळे नातेवाईकांनी संताप व्यक्त करत उच्च अधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल केली आहे.'

दरम्यान, जिल्हा आरोग्य विभागाच्या दुर्लक्षामुळे स्थलांतरित मजुराचा मृतदेह पूर्णपणे कुजल्याचा आरोप त्याच्या कुटुंबियांनी केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.