आंतरराष्ट्रीय प्रवास करणाऱ्यांना मिळणार 'बूस्टर डोस', केंद्रात घडामोडींना वेग

केंद्रीय आरोग्य मंत्रालय आंतरराष्ट्रीय प्रवास करणाऱ्यांसाठी कोविड लसीचा बूस्टर डोस देण्याचा विचार करत आहे
Booster Dose
Booster Doseसकाळ डिजिटल टीम
Updated on

कोरोनामुळे मार्च 2020 पासून बंद असलेली आंतरराष्ट्रीय प्रवासी सेवा आजपासून केंद्र सरकारने पुन्हा कार्यान्वित केली आहे. पहिल्या टप्प्यात १०० विमानांच्या उड्डाणाची यादी देखील जाहीर झाली. मात्र, भारतीय नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आणखी एक पाऊल उचलण्याचा प्रस्ताव नागरी उड्डाण मंत्रालयाने पाठवल्याची माहिती मिळत आहे. (Booster Dose to International Travelers)

यानुसार आंतरराष्ट्रीय प्रवास करणाऱ्यांसाठी कोविड लसीचा 'बूस्टर डोस' देण्याचा विचार सुरू आहे. प्रामुख्याने परदेशात जाणाऱ्या आणि भारतात परतणाऱ्यां नागरिकांसाठी हा डोस उपलब्ध असणार आहे. (Health ministry of India considering to give booster dose for Indians who travelling abroad)

Booster Dose
दुसऱ्या डोसपासून नऊ महिने झाल्यास बूस्टर डोस

आंतरराष्ट्रीय प्रवास करणाऱ्या भारतीयांचं कोरोनापासून संरक्षण होण्यासाठी हा बूस्टर डोस लागू करण्याबाबत चर्चा सुरू आहे. आता सध्या हा बूस्टर डोस फक्त आरोग्य कर्मचारी, गंभीर आजार असलेले आणि ६० वर्षांवरील लोकांना देण्यात येत आहे. आंतरराष्ट्रीय प्रवास करणाऱ्या भारतीयांना मोफत बूस्टर डोस द्यायचा की त्यांच्याकडून त्यासाठी शुल्क आकारायचे, यावरही चर्चा सुरू आहे.

Booster Dose
मन की बात : बारव स्वच्छता करणाऱ्या रोहन काळेचं PM मोदींनी केलं कौतुक

बूस्टर डोसची सध्या खूप चर्चा सुरू आहे. परराष्ट्र मंत्रालयाने काही दिवसापूर्वी म्हटलं होतं की काही देश बूस्टर डोसच्या अभावामुळे भारतीयांवर प्रवास करण्यास निर्बंध लादत होते. यावरून आता केंद्र सरकार आणखी एक लस देण्याचा विचार करत आहे.

भारतात आजपासून आंतरराष्ट्रीय उड्डाणे सुरू करण्यात आली आहेत. या पार्श्वभूमीवर परदेशी विमान कंपन्यांनी प्रवाशांना कोरोना मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे. आतापर्यंत भारतात, कोरोना लसीचे एकूण 183 कोटी डोस देण्यात आले आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()