जयपूर : एका १९ वर्षीय मूकबधिर तरुणीवर सामूहिक बलात्कार (Girl Physical Abused) झाल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. मुलीच्या पोटात दुखत असल्यानं ती रुग्णालयात तपासणीसाठी गेली. त्यावेळी ती गर्भवती असल्याचं समजलं. त्यानंतर ही घटना उघडकीस आली आहे.
पीडित तरुणी राजस्थानमधील भिलवाडा जिल्ह्यातील रहिवासी आहे. तिच्या पोटात दुखत होतं आणि रक्तस्त्राव होत होता. त्यामुळे ती जवळच्या ग्रामीण रुग्णालयात तपासणीसाठी गेली. त्यावेळी तपासणी केली असता ती गर्भवती असल्याचं डॉक्टरांना समजलं. डॉक्टरांनी पोलिसांना आणि स्थानिक प्रशासनाला माहिती दिली. त्यानंतर सांकेतिक भाषा तज्ज्ञाला बोलावून पीडितेकडून सर्व माहिती जाणून घेतली. ती दोन महिन्यापूर्वी शेतात काम करत असताना तीन अनोळखी व्यक्तींनी बलात्कार केल्याची माहिती तिनं दिली, असं भिलवाडाचे जिल्हाधिकारी आशिष मोदी यांनी सांगितलं. बलात्कार पीडितेचा गर्भपात करावा लागला. कारण गर्भधारणेमुळे तिचा जीव धोक्यात आला होता. मुलीला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे आणि ती ठीक आहे, असंही आशिष मोदी यांनी सांगितलं.
दरम्यान, पोलिसांनी कायदेशीर कारवाई सुरू केली असून आरोपींचा शोध घेण्याचा प्रयत्न सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.