Heatstroke : दिल्लीमध्ये तीन दिवसात उष्माघाताने 5 जणांचा मृत्यू; उष्णतेची लाट आणखी काही दिवस कायम राहणार

उत्तर भारतातील पंजाब, उत्तराखंड, राजस्थान, बिहार व हिमाचलप्रदेशात सुद्धा उष्णतामानात वाढ झाली आहे. या सर्व राज्यांमध्ये कमाल तापमान 41 अंश सेल्शियसपेक्षा अधिक आहे. हरीद्वारमध्ये सुद्धा कमाल तापमानाची नोंद 41 अंश सेल्शियस एवढी झाली आहे.
heatstroke
heatstrokesakal
Updated on

नवी दिल्लीः गेल्या आठ दिवसांपासून दिल्लीसह उत्तरभारतात उष्णतेची लाट असून पुन्हा काही दिवस ही लाट कायम राहिल, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. गेल्या तीन दिवसात दिल्लीत 5 जणांचा उष्माघाताने मृत्यू झाला आहे. तसेच उष्माघातामुळे रुग्णालयांमध्ये दाखल झालेल्यांची संख्याही वाढली आहे.

दिल्लीमध्ये यावर्षी सर्वाधिक तापमानाची नोंद झाली आहे. गेल्या आठ दिवसांपासून सुरू असलेली उष्णतेची लाट कमी होण्याची कोणतीही चिन्हे नाहीत. आज, बुधवारीसुद्धा दुपारपर्यंत कमाल तापमानाची नोंद 43 अंश सेल्शिअस एवढी झाली आहे.

रात्रीच्यावेळी सुद्धा तापमानात फारशी घट होत नसल्याने उष्माघाताने आजारी पडण्याचे प्रमाण वाढले आहे. दिल्लीचे मंगळवार रात्रीचे किमान तापमान सुद्धा 33 अंश सेल्शियस एवढे राहिले आहे. यामुळे विजेच्या मागणीमध्ये सुद्धा दिल्लीत वाढ झाली आहे. दिल्लीतील हे रात्रीचे सर्वाधिक किमान तापमान असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे. आता दिल्लीत 8 हजार मेगावैट विजेची मागणी आहे. दिल्लीतील राममनोहर लोहिया रुग्णालय, लोकनायक जयप्रकाश व सफदरजंग हॉस्पीटलमध्ये सुद्धा उष्माघाताचे 40 रुग्ण उपचार घेत आहेत.

heatstroke
Nitish Kumar Video : नीतीश कुमारांनी भर कार्यक्रमात का धरला PM मोदींचा हात? तुफान व्हायरल होतोय व्हिडीओ

उत्तर भारतातील पंजाब, उत्तराखंड, राजस्थान, बिहार व हिमाचलप्रदेशात सुद्धा उष्णतामानात वाढ झाली आहे. या सर्व राज्यांमध्ये कमाल तापमान 41 अंश सेल्शियसपेक्षा अधिक आहे. हरीद्वारमध्ये सुद्धा कमाल तापमानाची नोंद 41 अंश सेल्शियस एवढी झाली आहे.

heatstroke
Nandurbar Teacher Constituency Election : शिक्षकांनी ॲड. संदीप गुळवे यांच्या पाठीशी राहा : खासदार गोवाल पाडवी

एवढ्यात दिलासा नाही

बिहारमध्ये मौसमी वाऱ्याची काहीशी हालचाल झाल्याने तेथे तापमानात घट झाल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे. परंतु ही घट तात्कालिक असून मान्सूनचे आगमन झाल्याशिवाय तापमानात घट होणार असल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे. यामुळे संपूर्ण उत्तर भारतासाठी हवामान विभागाने रेड अलर्ट जारी केला आहे. देशात आतापर्यंत केवळ 64.5 मिमी पावसाची नोंद झाली आहे. पावसाचे हे प्रमाण सरासरीपेक्षा 20 टक्क्यांनी कमी असल्याने उष्णतेच्या लाटेत एवढ्यात घट होणार नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.