अहमदाबाद - गुजरातच्या अनेक भागांत आज मुसळधार पाऊस झाला. अहमदाबाद आणि सुरतसह अनेक शहरांतील सखल भागांत पाणी साठून राहिल्याने जनजीवन विस्कळित झाले. सुरतमधील पलसाना तालुक्यात दहा तासांत १५३ मि.मी. पाऊस झाला. सूरत, भूज, वापी भरूच व अहमदाबादमधील सखल भागांत पाणी साठले.
गुजरात राज्य आपत्ती व्यवस्थापन केंद्राने दिलेल्या माहितीनुसार रविवारी सकाळी सहा वाजल्यापासून दुपारी चार वाजेपर्यंतच्या दहा तासांत ४३ तालुक्यांमध्ये ४० मिलीमीटरपेक्षा अधिक पाऊस झाला.
मुसळधारेचा अंदाज
पुढील दोन दिवसांत गुजरातच्या अनेक भागांत मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. तर दक्षिण गुजरातमधील वळसाड, नवसारी जिल्ह्यांत,तसेच उत्तर गुजरातमधील बनासकांठा जिल्ह्यात तीन व चार जुलै रोजी मुसळधारेची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
प्रमुख ठिकाणचा पाऊस (मिलिमीटरमध्ये)
ठिकाण - मि.मी.
पलसाना - १५३
बारडोली - १३५
सूरत शहर - १२३
कामरेज - १२०
महुवा - ११९
वापी - ११७
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.