उत्तराखंडात ढगफुटीचा फटका नाशिकच्या भाविकांना; 27 जणांना मदत

uttarakhand heavy rain
uttarakhand heavy rainesakal
Updated on

नैनीताल (उत्तराखंड) : देशातील अनेक राज्यात या अवकाळी पाऊस होत आहे. उत्तराखंड (heavy rain in uttarakhand) आणि केरळची (kerala) स्थिती सर्वात वाईट आहे. या जोरदार पावसाचा मोठा तडाखा अनेक राज्यांत बसला आहे. उत्तराखंडात ढगफुटीचा फटका नाशिकच्या ४२ भाविकांना बसला आहे. चारधाम यात्रेसाठी गेलेले हे भाविक उत्तराखंडमध्ये अडकले आहेत. चारधाम यात्रेसाठी गेलेले हे भाविक उत्तराखंडमध्ये अडकले आहेत.

नैनीतालमध्ये 25 मृत्यू

महाष्ट्रात उत्तर भागात आणि विदर्भ, मराठवाड्यात बसला आहे. तर केरळ राज्यातही पावसाचा कहर पाहायला मिळाला आहे. आता तर उत्तराखंडमध्ये पावसाचा जोरदार तडाखा बसल्याने मोठे नुकसान झाले आहे. गेल्या तीन दिवसांपासून पावसामुळे उत्तराखंडमधील परिस्थिती बिकट झाली आहे. अनेक भागात मुसळधार पावसामुळे भूस्खलनच्या घटनाही घडल्या आहेत. पूर आणि पावसामुळे आतापर्यंत 40 लोकांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये नैनीतालमध्ये जास्तीत जास्त 25 मृत्यू झाले आहेत.

नाशिकचे ४२ भाविक अडकले

उत्तराखंड येथील महापूरात राज्यातील शेकडो भाविक अडकले असून, त्यात नाशिक जिल्ह्यातील ४२ भाविकांचा समावेश आहे. १५ जण ऋषीकेश येथे अडकले आहेत. मालेगाव व येवला येथील २७ व्यक्ती चारधाम करत नैनितालमार्गे हरिद्वार येथे जात होते. मात्र, नैनितालला रविवारी (ता. १७) सायंकाळी सातपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे ते तेथे अडकून पडले आहेत. भाविकांची तिथे कोणाशी ओळख नाही. तसेच त्यांना कुठलेही वाहन दिसत नाही. नैनितालच्या जुना बसस्टॉपवर उभ्या असलेल्या बसमध्ये बराच वेळ बसून राहावे लागले. बसस्थानकात कुठल्याही सुविधाविना अडकून पडलेल्या भाविकांनी नाशिकला जिल्हा यंत्रणेशी संपर्क साधून माहिती दिली. येथील आपत्ती व्यवस्थापन विभागाने तेथील यंत्रणेशी संपर्क साधून त्यांची सोय करण्याचे आवाहन केले.

uttarakhand heavy rain
जळगावात भाजपला जबर धक्का! खडसेंच्या सूनबाईंचा अर्ज बाद

नैनीताल (उत्तराखंड) परिसरात अडकलेल्या २७ नागरिकांशी येथील आपत्ती व्‍यवस्थापन आधिकाऱ्यांनी संपर्क साधला. नैनिताल येथील शहर पोलिसप्रमुख रोहतांगसिंग सागर यांच्याशी चर्चेअंती पर्यटकांची एक दिवसासाठी राहण्याची सोय करण्यात आली आहे. संपूर्ण उत्तराखंडमध्ये दोन दिवसांपासून जोरदार पावसामुळे डोंगराळ भागातील वाहतूक ठप्प आहे. काही भागात लहान- मोठे दरड कोसळल्यामुळे व हवामान खराब असल्यामुळे यात्रेकरूंचा मुक्काम नैनिताल शहरातील हॉटेलमध्ये करण्यात आला. त्यांची हरिद्वारला पोचविण्याचे नियोजन झाले आहे.

uttarakhand heavy rain
TRUTH Social - ट्रम्प यांचा स्वत:चा सोशल मीडिया प्लॅटफॉर्म

१५ जण ऋषीकेशला अडकून

नैनीतालला अडकून पडलेल्यांत येवला तालक्यातील चार शेतकरी आहेत, तर मालेगाव तालुक्यातील २४ जणांचा समावेश आहे. त्यात अंबासन, दाबली, काष्टी या भागातील साधारण २७ प्रवासी आहेत. याशिवाय ऋषीकेश येथे १५ प्रवासी अडकून आहेत. त्यामुळे नाशिकमधील एकूण ४२ प्रवासी उत्तराखंड भागात अडकले आहेत.

नैनीताल येथे २७, तर ऋषीकेश येथे १५ प्रवासी अडकून आहेत. जिल्हा प्रशासन उत्तराखंड येथील प्रशासनांशी सातत्याने संपर्कात आहे.-अर्जुन कुऱ्हाडे, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी

जिल्ह्यातील २७ पर्यटकांना ‘आपत्ती प्राधिकरण’ची मदत

पर्यटनासाठी नैनिताल (उत्तराखंड) येथे गेलेले जिल्ह्यातील २७ पर्यटक पुरात अडकले होते. त्‍यांनी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणकडे मदतीचा हात मागितला असता प्राधिकरणने तातडीने स्‍थानिक प्रशासनाशी संपर्क साधत मदत उपलब्‍ध करुन दिली आहे. हे पर्यटक मालेगाव, येवला तालुक्‍यातील आहेत. यासंदर्भात जिल्‍हा आपत्ती व्‍यवस्‍थापन अधिकारी अर्जुन कुऱ्हाडे यांनी मंगळवारी (ता. १९) माहिती दिली. त्‍यानुसार मालेगाव तालुक्‍यातील २३ व येवला तालुक्‍यातील चौघे पर्यटक उत्तराखंडला गेले होते. नैनिताल येथे भेट दिल्‍यानंतर ते हरिद्वारकडे रवाना झालेले असतानाच जोरदार पावसाला सुरवात झाली. त्यात हे सर्व पर्यटक अडकले. नैनिताल येथील जुन्या बस स्थानकातील बसगाडीत त्यांनी आधार घेत स्वत:चा बचाव केला. परंतु, आपत्‍कालिन परिस्‍थितीत स्‍थानिक स्‍तरावर सहाय्यता मिळणे कठीण झालेले होते. त्‍यामूळे या पर्यटकांनी नाशिकच्या जिल्हा प्रशासनाशी संपर्क केला. जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकाऱ्यांना मदतीबाबत निर्देश दिले.

uttarakhand heavy rain
आर्यन खान प्रकरणावर अमृता फडणवीसांची प्रतिक्रिया; म्हणाल्या..

अशी मिळाली मदत...

नागपूरला झालेल्या राष्ट्रीय स्‍तरावरील प्रशिक्षणात कुऱ्हाडे यांची नैनितालच्‍या काही स्‍वयंसेवी संस्‍थांच्या पदाधिकाऱ्यांशी ओळख झालेली होती. त्‍यामूळे त्‍यांनी संबंधितांशी संपर्क साधत पर्यटकांना पुढील प्रवासाबद्दल मार्गदर्शन केले. नैनितालचे शहर पोलीस प्रमुख रोहतांग सिंग सागर यांना संपर्क करुन मदत करण्याची विनंती केली. या उपाययोजनांमुळे पर्यटकांना योग्‍य वेळी मदत तर मिळालीच, शिवाय त्यांची राहण्याची व्‍यवस्‍थाही झाली. बुधवारी (ता. २०) सकाळी हे पर्यटक बसद्वारे हरिद्वारला पोहचतील, असे नियोजन झाले असल्‍याची माहिती कुऱ्हाडे यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.