Rain Update : यंदाच्या पावसाळ्यात हिमाचलात ३१ बळी ; ढगफुटीसह अचानक आलेल्या पुराने जीवितहानी

यंदाच्या पावसाळ्यात आतापर्यंत हिमाचल प्रदेशमध्ये २७ जून ते १६ ऑगस्टदरम्यान ढगफुटी व अचानक आलेल्या पुरांच्या ५१ घटनांत ३१ जणांचा मृत्यू झाला, अशी माहिती राज्याच्या आपत्कालीन प्रतिसाद केंद्राने दिली. इतर ३३ जण बेपत्ता आहेत. हिमाचलमध्ये मॉन्सूनचे २७ जूनला आगमन झाले होते.
Rain Update
Rain Update sakal
Updated on

सिमला : यंदाच्या पावसाळ्यात आतापर्यंत हिमाचल प्रदेशमध्ये २७ जून ते १६ ऑगस्टदरम्यान ढगफुटी व अचानक आलेल्या पुरांच्या ५१ घटनांत ३१ जणांचा मृत्यू झाला, अशी माहिती राज्याच्या आपत्कालीन प्रतिसाद केंद्राने दिली. इतर ३३ जण बेपत्ता आहेत. हिमाचलमध्ये मॉन्सूनचे २७ जूनला आगमन झाले होते.

या नैसर्गिक आपत्तीत १२१ घरांचे पूर्ण किंवा अंशत: नुकसान झाले आहे. या काळात भूस्खलनाच्या ३५ घटनांत तीन जणांचा मृत्यू झाला. मंडी जिल्ह्यात भूस्खलनाच्या सर्वाधिक नऊ तर किन्नौर आणि सिमलात प्रत्येकी सहा घटना घडल्या. लाहौल, स्पिती व चंबात प्रत्येकी चार तर सोलनमध्ये तीन ठिकाणी भूस्खलन झाले. राज्यात ढगफुटी, अचानक पूर येणे व भूस्खलनाच्या घटना अधिकृत आकडेवारींपेक्षा अधिक असल्याचा नागरिकांचा दावा आहे. दरम्यान, राज्यात अनेक ठिकाणी हलका पाऊस सुरू असून रविवारी ९५ रस्ते वाहतुकीसाठी बंद करण्यात आले होते. पाणीपुरवठ्याच्या ३५ तर ऊर्जा प्रकल्पाच्या ४७ योजनांवरही परिणाम झाला आहे. राज्यात अतिवृष्टीमुळे सुमारे १,१४० कोटींच्या रस्त्यांचे नुकसान झाले आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाचे ५०२ कोटींचे तर जलशक्ती विभागाने ४६९ कोटींचे नुकसान झाले आहे.

हवामान खात्याने २१ तारखेपर्यंत मुसळधार पावसाचा ‘येलो अलर्ट’ जारी केला आहे.

ढगफुटी, अचानक पुराच्या घटना

  • लाहौल, स्पिती २२

  • किन्नौर ११

  • उना ६

  • कुलू ३

  • मंडी ३

  • सिरमौर २

  • चंबा १

  • हमीरपूर १

  • सिमला १

  • सोलन १

  • बंद रस्ते

  • कुलू ३३

  • मंडी २३

  • सिमला २३

  • कांगरा १०

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.