एम. ए. एस. कुमार
हैदराबाद, ता. १ ः बंगालच्या उपसागरावर निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे तेलंगण आणि आंध्र प्रदेशात शुक्रवारी रात्रीपासून मुसळधार पाऊस पडत असून येथील अनेक नद्यांना पूर आल्याने अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळित झाले आहे. तेलंगणचे मुख्यमंत्री ए. रेवंत रेड्डी आणि आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना परिस्थिचा आढावा घ्यायला सांगितला असून, नागरिकांना आवश्यक ती सर्व मदत करण्याचे आदेश दिले आहेत.