महाराष्ट्रात पुढचे ४ दिवस धो-धो पाऊस! - IMD

heavy rain
heavy rain esakal
Updated on

मुंबई : आयएमडीच्या (IMD) नॅशनल वेदर फोरकास्टिंग सेंटर कडून सांगण्यात आलं की, 1960 नंतर ही दुसरी वेळ आहे, जेव्हा मान्सून इतक्या उशिरा परतत आहे. येत्या चार दिवसात महाराष्ट्र, (Maharashtra) गोव्यासह (Goa) 6 राज्यांच्या किमान भागांमध्ये मुसळधार पाऊस (Heavy Rains) होण्याची शक्यता आहे. दरम्यान आकाशात विजांचा कडकडाट अधिक असणार असून नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

मान्सूनच्या परतीला विलंब; 'या' राज्यात होणार मुसळधार पाऊस

हवामान खात्याच्या अंदाजानुसार, शुक्रवारी अंदमान आणि निकोबारमध्ये मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर कोकण आणि गोवा, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, कर्नाटकातील किनारपट्टी भाग, केरळ आणि पुद्दुचेरी येथील माहे येथे मुसळधार पावसाची शक्यता आहे. या सर्व भागात 9 ऑक्टोबरला देखील मुसळधार पाऊस पडू शकतो. या राज्यांव्यतिरिक्त, तामिळनाडू, पुद्दुचेरी आणि कराईकलमध्येही 10 ऑक्टोबर रोजी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर या क्षेत्रात 11 ऑक्टोबर रोजी या मुसळधार पाऊस पडू शकतो. मान्सून (Monsoon)आता परतीच्या मार्गावर आहे. तर काही राज्यांमध्ये पावसाचा दौरा अद्याप पूर्ण शिल्लक आहे. हवामान खात्यानं वर्तवलेल्या अंदाजानुसार, येत्या चार दिवसात महाराष्ट्र, (Maharashtra) गोव्यासह (Goa) 6 राज्यांच्या किमान भागांमध्ये मुसळधार पाऊस (Heavy Rains) होण्याची शक्यता आहे. यावेळी मान्सूनच्या परतीला विलंब झाल्याचे सांगितलं जात आहे.

heavy rain
Airforce day 2021: आता भारतातूनच करता येईल बालाकोट सारखा Air Strike

महाराष्ट्रात असा असेल पाऊस

गेल्या दोन दिवसांपासून मुंबईसह राज्यात अनेक जिल्ह्यांना मुसळधार पावसानं (Heavy Rainfall in Maharashtra) झोडपलं आहे. पुण्यासह ठाणे आणि घाट परिसरात तर ढगफुटीसदृश्य पाऊस (Cloudburst Rain) झाला आहे. पुढील पाच दिवस राज्यात विदर्भातील काही जिल्हे वगळता राज्यात सर्वत्र मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याकडून (IMD) वर्तवण्यात आली आहे. दरम्यान आकाशात विजांचा कडकडाट अधिक असणार असून नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

heavy rain
Air Force Day: PM मोदींनी दिल्या सदिच्छा; वाचा IAFबद्दलच्या खास गोष्टी

बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या गुलाब चक्रीवादळामुळे महाराष्ट्रात अनेक ठिकाणी जोरदार पावसानं हजेरी लावली आहे. यानंतर आता बंगालच्या उपसागरात पुढील तीन दिवसांत पुन्हा एकदा हवेच्या कमी दाबाचं क्षेत्र निर्माण होण्याची शक्यता आहे. 10 ऑक्टोबरनंतर पुढील चार ते पाच दिवसांत हे हवेच्या कमी दाबाचं क्षेत्र ओडिशा आणि आंध्र प्रदेशाच्या किनारपट्टीकडे सरकणार आहे. याचा परिणाम म्हणून 10 ऑक्टोबर महाराष्ट्रात अनेक ठिकाणी धुव्वाधार पावसाची शक्यता आहे. 2019 मध्ये, 9 ऑक्टोबरपासून मान्सून वायव्य भारतातून परतण्यास सुरुवात केली होती. देशात जूनमध्ये 110 टक्के, जुलैमध्ये 93 टक्के आणि ऑगस्टमध्ये 76 टक्के पाऊस झाला आहे. या महिन्यांमध्ये सर्वाधिक पाऊस पडतो. जुलै आणि ऑगस्टमध्ये कमी पाऊस झाला असला तरी सप्टेंबरमध्ये त्याची उणीव भरुन निघाली कारण सप्टेंबरमध्ये 135 टक्के रेकॉर्ड ब्रेक पाऊस झाला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.