Ayodhya Ram Mandir : अयोध्येतील राम मंदिरात काल ( सोमवार, २२ जानेवारी) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडला. त्यानंतर आजपासून देशभरातील रामभक्ताना रामलल्लाचे दर्शन घेता येणार आहे. तसेच लोक प्रभू रामाची पूजा देखील करथा येणार आहे. दरम्यान प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या दुसऱ्याच दिवशी अयोध्येतील राम मंदिरात भक्तांनी मोठ्या संख्येने गर्दी केल्याचे पाहायला मिळाले. कडाक्याच्या थंडीत देखील मोठ्या उत्साहात लोक दर्शनासाठी पोहचले होते.
सोमवारी (२२ जानेवारी) शुभ मुहूर्तावर रामलल्लाचा प्राणप्रतिष्ठा सोहळा विधीवत संपन्न होताच रामभक्तांची प्रदीर्घ प्रतीक्षा संपली असून आजपासून प्रत्येक सामान्य भक्ताला रामलल्लाचे दर्शन घेता येणार आहे. रामललाचे दर्शन सकाळी 8 ते रात्री 10 वाजेपर्यंत असेल. दर्शनाची वेळेनुसार सकाळी 8 ते दुपारी 1 वाजेपर्यंत रामललाचे दर्शन घेण्याची संधी मिळेल. यानंतर दुपारी 3 ते 10 वाजेपर्यंत लोकांना रामललाचे दर्शन घेता येणार आहे.
आरतीची वेळ किती?
राममंदिरात दुपारी 12 वाजता रामलल्लाची भोग आरती होणार असून सायंकाळी 7.30 वाजता दुसऱी आरती होणार आहे. यानंतर 8.30 वाजता शेवटची आरती करून रामललाला झोपवले जाते. आरतीसाठी मोफत पास घ्यावे लागतील, ते ऑनलाइन आणि ऑफलाइन घेता येतील. श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्राच्या वेबसाइटनुसार, वैध सरकारी ओळखपत्र दाखवून ऑफलाइन पास श्री रामजन्मभूमी येथील कॅम्प ऑफिसमधून घेता येणार आहे. ऑनलाइन पाससाठी, srjbtkshetra.org वेबसाइटवर जावे लागेल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.