नवी दिल्ली- झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी सोमवारी विधानसभेमध्ये बहुमत सिद्ध केले आहे. सोरेन यांनी विश्वासदर्शक ठराव जिंकला आहे. यानंतर आता मंत्रिमंडळाचा विस्तार केला जाईल अशी माहिती आहे. राज्यात जेएमएम, आरजेडी आणि काँग्रेसचे मंत्री बनवले जातील. विश्वासदर्शक ठरावाआधी राज्यामध्ये राजकीय हालचाल पाहायला मिळाली होती.
मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी विश्वासदर्शक ठरावाआधी त्यांच्या निवासस्थानी एक बैठक घेतली. यात विश्वासदर्शक ठराव आणि मंत्रीपद कोणाला दिले जाईल याबाबत चर्चा झाली. झारखंड मुक्ती मोर्चाकडे बहुमत असल्याने विश्वासदर्शक ठराव जिंकणे अवघड नव्हते. राजभवनकडून मंजुरी मिळाल्यानंतर दुपारी तीन वाजता बिरसा मुंडा स्टेडियमवर मंत्री शपथ घेतील. याशिवाय मंत्रिमंडळ विस्तार देखील केला जाईल.
विश्वासदर्शक ठराव विधानभवनात मांडला तेव्हा एकही विरोधीपक्षाचा आमदार उपस्थित नव्हता. त्यामुळे प्रस्तावाविरोधात एकही मत पडलं नाही. प्रस्तावा मांडण्याआधी विरोधक वेलमध्ये येऊन गोंधळ घालत होते. त्यानंतर विरोधकांनी सभात्याग केला. अपक्ष आमदार सरयू राय यांनी तटस्थ भूमिका घेतली. सोरेन यांच्या बाजूने ४५ मतं पडली. त्यामुळे त्यांनी सहज विश्वासदर्शक ठराव जिंकला आहे.
विधानसभेमध्ये विश्वासदर्शक ठराव मंजूर होण्यासाठी ३९ आमदारांची आवश्यकता होती. इंडिया आघाडीकडे ४५ आमदार आहेत. ४८ वर्षीय हेमंत सोरेन जमीन घोटाळ्याप्रकरणी तुरुंगात होते. ते जामिनावर बाहेर आहेत. चंपाई सोरेन यांनी राजीनामा दिल्यानंतर त्यांनी ४ जुलै रोजी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती.
झारखंड विधानसभेची संख्या ८१ आहे, पण सध्या विधानसभेत ७६ आमदार आहेत. कारण, ४ आमदार लोकसभेवर निवडून गेले आहेत. यात दोन भाजप आणि दोन झारखंड मुक्ती मोर्चाच्या आमदारांचा समावेश आहे. एका आमदाराने राजीनामा दिला आहे. ३ जुलै रोजी सोरेन यांनी राज्यपाल सीपी राधाकृष्णन यांनी भेट घेऊन त्यांच्याकडे सरकार स्थापनेचा दावा केला. आपल्याकडे ४४ आमदारांचा पाठिंबा असल्याचा दावा त्यांनी केला होता.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.