गुजरातमध्ये 1439 कोटींचे हेरॉईन जप्त, आरोपीला पंजाबमधून अटक

इराणमधून आयात करण्यात आलेली ही खेप जिप्सम पावडरची असल्याचे सांगण्यात येत होते
हिरॉईन जप्त
हिरॉईन जप्तSakal
Updated on

अहमदाबाद : गुजरातच्या ATS अधिकाऱ्यांना कांडला बंदरात मोठे यश मिळाले आहे. गुजरात एटीएस टीम आणि महसूल गुप्तचर संचालनालयाच्या (DRI) संयुक्त कारवाईत 17 कंटेनरमधील 10,318 बॅगमध्ये असलेले हेरॉईन जप्त केले असून, याचे वजन सुमारे 400 मेट्रिक टन असल्याचे सांगितले जात आहे. कांडला बंदरात आयात केलेल्या मालाची तपासणी करत असताना ही कारवाई करण्यात आली आहे. इराणच्या बंदरातून ही खेप कांडला बंदरात पोहोचली होती. इराणमधून आयात करण्यात आलेली ही खेप जिप्सम पावडरची असल्याचे सांगण्यात येत होते, मात्र चौकशीअंती त्यात मोठ्या प्रमाणात हेरॉईन जप्त करण्यात आले आहे.

हिरॉईन जप्त
सरकारकडून १० भारतीय तर ६ पाकिस्तानी युट्यूब न्यूज चॅनेल्स ब्लॉक

सध्या, तपास पथकाने नार्कोटिक ड्रग्ज अँड सायकोट्रॉपिक सबस्टन्स (एनडीपीएस) कायदा 1985 च्या नियमांनुसार आयातदाराला अटक केली असून, डीआरआयने सांगितले की, आतापर्यंत 205.6 किलो हेरॉईन जप्त केले असून, ज्याची बाजारातील किंमत 1439 कोटी रुपये असल्याचे सांगितले जात आहे. आयातदाराने त्याचा पत्ता उत्तराखंड असा लिहिला होता पण तो त्या पत्त्यावर उपस्थित नव्हता. यानंतर डीआरईने देशभरात छापे टाकले. मात्र, अखेर तपास यंत्रणेने त्याला पंजाबमधून अटक केली, त्याला पंजाबमधील एका गावातून पकडण्यात आले.

हिरॉईन जप्त
मोदी सरकारची आठवी वर्षपूर्ती; देशभर गुंजणार हनुमान चालिसा

गेल्या वर्षी इराणहून 17 कंटेनर कांडला पोहोचले होते

गुजरातचे पोलीस महासंचालक आशिष भाटिया यांनी सांगितले की, गेल्या वर्षी सप्टेंबर ते ऑक्टोबर दरम्यान 17 कंटेनर इराणहून कांडला बंदरात पोहोचले होते आणि तेव्हापासून त्यांची चौकशी सुरू होती. त्यानंतरही कंटेनरची झडती घेण्यात आली असली तरी अधिकाऱ्यांना काहीही संशयास्पद आढळले नसल्याचे त्यांनी सांगितले. नंतर, एका कंटेनरमध्ये प्रतिबंधित सामग्री असल्याच्या ATS च्या विशिष्ट इनपुटच्या आधारे, DRI ने फॉरेन्सिक तज्ञांच्या मदतीने 205.6 किलो हेरॉईन जप्त केले. गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये गुजरातच्या मुंद्रा बंदरातून 21,000 कोटी रुपयांचे 2,988 किलो हेरॉईन जप्त करण्यात आल्याच्या काही महिन्यांनंतर ही घटना घडली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.