Delhi High Alert: स्वातंत्र्यदिनानिमित्त दिल्लीत हायअलर्ट! बांगलादेशी नागरिकांची यादी बनवण्याच्या सूचना

दिल्ली पोलिस मुख्यालयात झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत दिले महत्वाचे निर्देश
red fort delhi closed
red fort delhi closed
Updated on

नवी दिल्ली : भारताचा शेजारचा देश बांगलादेशात सध्या गृहयुद्ध भडकलं आहे. अनेक बांगलादेशी नागरिक भारताच्या हद्दीत येण्याचा प्रयत्न करत आहेत. यापार्श्वभूमीवर भारताच्या स्वातंत्र्यदिनानिमित्त दिल्लीत हायअलर्ट जाहीर करण्यात आला आहे.

red fort delhi closed
Pooja Khedkar: पूजा खेडकरला दिलासा; दिल्ली हायकोर्टाची दिल्ली पोलीस अन् UPSCला नोटीस

दिल्लीच्या पोलीस मुख्यालयात उच्चस्तरीय बैठक पार पडली. या बैठकीत स्वातंत्रदिनाच्या पार्श्वभूमीवर बांगलादेशमधील परिस्थिती बघता दिल्ली NCR मध्ये कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून बैठकीत चर्चा झाली. यानंतर दिल्ली पोलिसांना अलर्ट मोडवर राहण्याचे आदेश देण्यात आले.

red fort delhi closed
Sanjay Raut: "राज्यात सध्या सुपारीचं काम सुरु"; राऊतांनी पत्रकार परिषदेत थेट फोटोच दाखवले

स्पेशल सेल, क्राईम ब्रान्च आणि जिल्हा पोलिसांना अलर्ट राहण्याच्या सूचना यावेळी देण्यात आल्या आहेत. यावेळी पोलीस आयुक्तांनी दिल्लीत राहणाऱ्या बांगलादेशी नागरिकांची यादी बनवण्याच्या सूचना दिल्या आहेत. यामध्ये गुन्हेगारी पार्श्वभूमी असणाऱ्या बांगलादेशी नागरिकांची स्वतंत्र यादी बनवण्याच्या सूचनाही यावेळी दिल्या गेल्या. पंजाब, राजस्थान, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश आणि हरयाणा राज्याचे वरिष्ठ अधिकारी या बैठकीला उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.