दिल्ली हायकोर्टाने लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांची मुलगी अंजली बिरला यांच्याविरोधातील अपमानजनक सोशल मीडिया पोस्टसंबंधी मोठा आदेश जारी केला आहे. हायकोर्टाने Google आणि X (माजी Twitter) ला निर्देश दिले आहेत की त्यांनी २४ तासांच्या आत अंजली बिरला यांच्याविरोधातील सर्व अपमानजनक पोस्ट सोशल मीडियावरून हटवाव्यात.
दिल्ली उच्च न्यायालय अंजली बिर्ला यांच्या याचिकेवर सुनावणी करत होते. याचिकेमध्ये अंजली बिरला यांनी सोशल मीडियावर त्यांच्याविरोधात चालविण्यात आलेल्या खोट्या मोहिमेबद्दल न्यायालयाला माहिती दिली. तीन वर्षे उलटून गेल्यानंतरही त्यांच्याविरोधात खोट्या दाव्यांचा सोशल मीडियावर प्रसार होत असल्याची तक्रार त्यांनी केली.
वरिष्ठ वकील विनय सक्सेना यांनी न्यायालयाला सांगितले की, सोशल मीडिया पोस्टच्या माध्यमातून अंजली बिर्ला यांची प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न केला जात आहे. हे अधिक काळ चालू ठेवले जाऊ शकत नाही. यानंतर न्यायालयाने Google आणि X ला निर्देश दिले की, २४ तासांच्या आत अंजली बिरला यांच्याविरोधातील सर्व अपमानजनक पोस्ट हटवाव्यात.
अंजली बिर्ला यांनी दिल्ली हायकोर्टात मानहानिची केस दाखल केली होती. या केसचे कारण म्हणजे सोशल मीडियावर त्यांच्याविरोधात अनेक दावे करण्यात येत आहेत. या दाव्यांमध्ये म्हटले जात होते की अंजलीने UPSC परीक्षा आपल्या वडिलांच्या प्रभावामुळे पास केली आहे. अंजलीने या आरोपांना आधीच फेटाळले होते आणि या प्रकारचे आरोप त्यांच्या वडिलांच्या प्रतिमेला धक्का पोहोचविण्याचा षडयंत्र असल्याचे सांगितले होते.
हायकोर्टाचा आदेश काय?
लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांची मुलगी अंजली बिर्ला भारतीय रेल्वे कार्मिक सेवा (IRPS) च्या अधिकारी आहेत. त्यांनी हायकोर्टात दाखल केलेल्या याचिकेमध्ये सर्व अपमानजनक पोस्ट हटविण्याची मागणी केली होती. या प्रकरणात अंजली यांनी तात्काळ सुनावणीची मागणी केली होती. न्यायालयाने त्यांना तात्काळ दिलासा देत Google आणि X ला त्यांच्या विरोधातील सर्व पोस्ट हटवण्याचा आदेश दिला. हा आदेश तात्पुरता आहे आणि पुढील आदेश येईपर्यंत वैध राहील. या प्रकरणाची पुढील सुनावणी १५ ऑक्टोबरला होणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.