Hijab Day
Hijab Dayesakal

Hijab Day : दिल्लीकरांच्या काळजाचा ठोका चुकवते ही बाइक चालवणारी हिजाबवाली!

स्पोर्ट्स बाईक चालवणे हे सोप्पे असले तरी ते हिजाब घालून ते करणे अवघड आहे
Published on

आजवर तूम्ही अनेक स्पोर्ट्स बाईक चालणाऱ्या तरूणी पाहिल्या असतील. पण, आज आपण जीच्याबद्दल बोलणार आहोत ती जरा वेगळीच आहे.  दिल्लीची रोशनी मिसबाह बायकर्नी म्हणूनही ओळखली जाते. तूम्ही म्हणाल यात काय खास आहे. इतर मुलीही चालवतात की बाईक. पण, दिल्लीची हि तरूणी खास आहे कारण ती एक मुस्लिम तरूणी आहे जी हिजाब घालून बाईक चालवते.

स्पोर्ट्स बाईक चालवणे हे सोप्पे असले तरी ते हिजाब घालून ते करणे अवघड आहे. पण, हे धाडस हि तरूणी लिलया करते. कारण, तिला वेड आहे बाईक चालवण्याचे.

स्पोर्ट्स बाईक चालवताना वजनदार हेल्मेट घालावे लागते. त्या हेल्मेटबाबतीतही अनेकांच्या तक्रारी असतात. पण, रोशनीला हिजाबची काहीच अडचण होत नाही. जामिया मिलिया इस्लामिया येथून अरबी संस्कृत अभ्यासात एमए केले आहे.

काळ्या रंगाचे लेदर जॅकेट, टी-शर्ट, जीन्स आणि हिल्सचे बूट घालून जेव्हा ती डोक्यावर हिजाब घालून बाइकवरून फिरते तेव्हा हे तिला इतरांपेक्षा वेगळे बनवते. ज्यामुळे लोकांच्या नजरा तिच्यावर खिळतात.

Hijab Day
Sana Khan On Hijab: हिजाब परिधान करण्याचं कारण सांगत ढसाढसा रडू लागली सना, ऐकून अंगावर येईल काटा...

रोशनीच्या पार्किंगमध्ये ८० लाख किमतीची कावासाकी निन्जा एचआर-२ हिच्यासह अनेक महागड्या बाइक्स आहेत. ऑनलाइन सेन्सेशन म्हणून ओळखली जाणारी रोशनी तिच्या संस्कृतीबद्दलही खूप गंभीर आहे.

रोशनी मिसबाह तिच्या कावासाकी निन्जावर कॉलेजमध्ये पोहोचल्यावर प्रत्येकजण तिच्याकडे पाहतो. या दरम्यान ती तिची संस्कृतीही जपते. रोशनी ही विंडचेंजर्स आणि दिल्ली रॉयल एनफिल्ड रायडर्स सारख्या ग्रूपचीही सदस्य आहे. अ‍ॅव्हेंजर बाईक असताना ती अ‍ॅव्हेंजर्स क्लबची सदस्यही होती.

Hijab Day
Hijab Ban Controversy: मुलींना अल्लाहने हिजाब घालण्यास सांगितलय; ओवेसींचा अजब दावा

रोशनी दिल्लीच्या बायकर्नी ग्रुपची सर्वात तरुण बाइकर आहे. हा ग्रुप महिला बाईक रायडर्सच्या माध्यमातून देशभरात लैंगिक समानतेचा संदेश देतो. रोशनीला बाईकचे वेड अनेक वर्षांपासूनचे आहे.

Hijab Day
Flying Bike: आता हवेतही होणार धूम धूम, फ्लाइंग बाईकचे बुकिंग सुरू; किंमत तब्बल...

या प्रवासाच्या सुरूवातीबद्दल रोशनी सांगते की, माझ्या वडिलांनाही वेगवेगळ्या बाइक्स चालवण्याची आवड होती. त्यांनी एकदा मला सांगितले की, जर त्यांना मागच्या सीटवर बसवून मी गाडी चालवली तर ते मला व्हेस्पा गाडी घेऊन देतील.

Hijab Day
Iran Hijab Row : 'हिजाब'विरोधात इराणी महिला आक्रमक; 700 जणींना अटक, 41 लोकांचा मृत्यू

हे चॅलेंज स्विकारू मी स्वतः बाईक चालवायला शिकले आणि तिने स्वतःसाठी एक अव्हेंजर बाईकही विकत घेतली. आणि आता मी बऱ्याच लांबच्या राईड्स करते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.