'हिजाब न घातल्याने महिलांवर बलात्कार होतो', काँग्रेस नेत्याचे वक्तव्य

hijab row congress leader zameer ahmed said women get raped when they dont wear hijab
hijab row congress leader zameer ahmed said women get raped when they dont wear hijab
Updated on

कर्नाटकमध्ये सुरू असलेल्या हिजाब वादावर (Hijab Row) काँग्रेसच्या एका नेत्याने वादग्रस्त विधान केले आहे. नेते जमीर अहमद (Zameer Ahmed) यांनी रविवारी दावा केला की, भारतात सर्वाधिक बलात्काराच्या घटना नोंदवल्या जातात कारण महिला 'पर्दा' (बुरखा) करत नाहीत किंवा चेहरा झाकत नाहीत.

एएनआय या वृत्तसंस्थेने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये अहमद बोलताना दिसत आहेत की, "मुली मोठ्या झाल्यावर, त्यांचे सौंदर्य लपवण्यासाठी 'पर्दा' (बुरखा) ही हिजाब मागची संकल्पना आहे. त्यांचे सौंदर्य दिसू नये. मला वाटतं जगात सर्वाधिक बलात्काराच्या घटना भारतात होतात. कारण स्त्रिया 'पर्दा' करत नाहीत." असे ते म्हणाले ते पुढे म्हणाले की "हिजाब घालणे सक्तीचे नाही आणि वर्षानुवर्षे ही प्रथा आहे"

hijab row congress leader zameer ahmed said women get raped when they dont wear hijab
येतेय महिंद्राची इलेक्ट्रिक कार; आनंद महिंद्रांनी रिलीज केला टीझर

अहमदम्हणाले की, इस्लाममध्ये हिजाब म्हणजे पर्दा. कदाचित त्यांच्या घरात एकही स्त्री किंवा मूल नसेल, ते मला माहीत नाही. त्यांच्या घरात एखादी स्त्री किंवा लहान मूल असते तर त्यांना हिजाब घालण्याचा अर्थ कळला असता. हिजाब घालणे म्हणजे काय? म्हणजे मुलगी मोठी झाल्यावर तिला पडद्यात ठेवतात. तिचे सौंदर्य दुसऱ्यांना दाखवले नाही पाहीजे. तीचे सौंदर्य लपविण्यासाठी तीला पडद्यात ठेवले जाते.

जमीर अहमद म्हणाले की, भारतात बलात्कार ही मोठी समस्या आहे. बलात्काराचे कारण काय? महिलांवर बलात्कार होण्याचे कारण म्हणजे त्यांना पडद्याआड न ठेवणे हे आहे. हिजाब घालण्याचा पध्दत आजपासून नाहीये आणि ती गरजेचीही नाही. ज्याला घालायचे आहे, ज्याला सुरक्षित राहयचे, ज्याला स्वतःचे सौंदर्य इतरांना दाखवायचे नाही, त्या हिजाब घालतात. हिजाब घालणे सक्तीचे नाही, तो वर्षानुवर्षे घातला जात आहे असेही त्यांनी सांगितले.

hijab row congress leader zameer ahmed said women get raped when they dont wear hijab
फक्त एक रिचार्ज, मिळेल 455 दिवसांपर्यंत दररोज 3GB डेटा अन् बरंच..

सध्या कर्नाटकच्या काही भागात हायस्कूल आणि कॉलेज कॅम्पसमध्ये हिजाबवरून वाद सुरू आहे. जानेवारीमध्ये जेव्हा हिजाब घातलेल्या सहा मुलींना उडुपी येथील कॉलेजमध्ये प्रवेश नाकारण्यात आला तेव्हा हा वाद सुरू झाला. काही विद्यार्थिनींनी याला विरोध केला असता काही विद्यार्थिनी भगवे स्कार्फ घालून याविरोधात रस्त्त्यावर उतरल्या. यामुळे तणाव वाढला आणि काही ठिकाणी या घटनांनी हिंसक वळण देखील घेतले, हे प्रकरण आता कर्नाटक उच्च न्यायालयात प्रलंबित आहे.

hijab row congress leader zameer ahmed said women get raped when they dont wear hijab
'व्हॅलेंटाईन डे'साठी परफेक्ट गिफ्ट, बजेटमध्ये मिळतील हे 5 गॅजेट्स

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()