बंगळुरू : गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या हिजाब प्रकरणावर कर्नाटक उच्च न्यायालयानं (Karnataka High Court) आज (मंगळवार) महत्त्वाचा निकाल दिला. हिजाबच्या बंदीविरोधात (Hijab Controversy) कर्नाटक उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. या याचिकांवर सुनावणी करताना उच्च न्यायालयानं महत्त्वाची निरीक्षणं नोंदवली आहेत. शैक्षणिक संस्थांमध्ये हिजाब बंदी योग्यच आहे. हिजाब ही मुस्लिम धर्माचरणातील आवश्यक बाब नसल्याचं सांगत कर्नाटक उच्च न्यायालयानं यासंदर्भातील याचिका फेटाळून लावल्या.
या कोर्टाच्या निकालानंतर कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई (CM Basavaraj Bommai) यांनी पहिली प्रतिक्रिया दिलीय. मुख्यमंत्री बोम्मई म्हणाले, आमच्या मुलांच्या भविष्याचा आणि शिक्षणाचा प्रश्न आहे. सर्वांनी न्यायालयाच्या निर्णयाचं पालन करायला हवं, त्यामुळं कोणीही कायद्यापेक्षा मोठा नाहीय. न्यायालयानं गणवेशाचा (Court Verdict On hijab) आदेश कायम ठेवला असून मुलांनी सहकार्य करावं, असं आवाहनही त्यांनी केलंय.
ते पुढे म्हणाले, विद्यार्थ्यांसाठी शिक्षण महत्त्वाचं आहे. त्यामुळं विद्यार्थ्यांनी कर्नाटक उच्च न्यायालयाच्या आदेशाचं पालन करावं. निकालानंतर कोणीही महाविद्यालयांवर बहिष्कार टाकू नये. तसेच कोणत्याही नेत्यानं कायदा हातात घेण्याचा प्रयत्न करुन नये. त्याचबरोबर सर्व पालक, शिक्षक, विद्यार्थी आणि समुदायानं शांतता राखावी, असं आवाहनही बोम्मई यांनी शेवटी केलंय.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.