Himachal Pradesh : निवडणुकीपूर्वीच काँग्रेसला मोठा झटका; पक्षाचे कार्याध्यक्षच भाजपात दाखल

राजस्थानमध्ये राजकीय संकटाचा सामना करणाऱ्या काँग्रेसला आता हिमाचल प्रदेशमध्ये मोठा झटका बसलाय.
Himachal Pradesh Political News
Himachal Pradesh Political Newsesakal
Updated on
Summary

राजस्थानमध्ये राजकीय संकटाचा सामना करणाऱ्या काँग्रेसला आता हिमाचल प्रदेशमध्ये मोठा झटका बसलाय.

Himachal Pradesh Political News : राजस्थानमध्ये राजकीय संकटाचा सामना करणाऱ्या काँग्रेसला (Congress) आता हिमाचल प्रदेशमध्ये मोठा झटका बसलाय. हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीपूर्वी (Himachal Pradesh Assembly Election) पक्षाचे कार्याध्यक्ष हर्ष महाजन (Harsh Mahajan) यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन भाजपमध्ये प्रवेश केलाय.

केंद्रीय मंत्री पियुष गोयल (Piyush Goyal) आणि विनोद तावडे (Vinod Tawde) यांच्या उपस्थितीत हर्ष महाजन यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. यावेळी हिमाचल भाजपचे अनेक दिग्गज नेते उपस्थित होते. हर्ष महाजन हे हिमाचलमधील काँग्रेस पक्षाचा मोठा चेहरा आहेत. हर्ष महाजन 2003-08 या काळात वीरभद्र सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री होते.

Himachal Pradesh Political News
Congress : फक्त 'पीएफआय'वरच का? RSS वरही बंदी घाला; काँग्रेस खासदाराची मागणी

त्याचबरोबर महाजन हे माजी मुख्यमंत्री वीरभद्र सिंह यांच्या सर्वात विश्वासू लोकांपैकी एक होते. हर्ष 1993 ते 2007 या काळात चंबा विधानसभा मतदारसंघातून तीनदा आमदार राहिले आहेत. याशिवाय, 2007 पासून माजी मुख्यमंत्री दिवंगत वीरभद्र सिंह यांची निवडणूकही महाजन यांनी हाताळली होती. 1993 मध्ये ते पहिल्यांदा आमदार झाले.

Himachal Pradesh Political News
Supreme Court : नोटाबंदीवर 12 ऑक्टोबरला होणार सुनावणी; 5 सदस्यीय घटनापीठाची स्थापना

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()