Himachal Pradesh- हिमाचल प्रदेशमध्ये काँग्रेस संकटात सापडली आहे. मंगळवारी झालेल्या राज्यसभा निवडणुकीत क्रॉस वोटिंग झाली होती. काँग्रेसच्या सहा आमदारांनी भाजपच्या उमेदवाराला मतदान केलं होतं. त्यानंतर आता हिमाचल प्रदेशातील काँग्रेस मंत्री विक्रमादित्य सिंह यांनी राजीनामा दिला आहे.
विक्रमादित्य सिंह हे माजी मुख्यमंत्री विरभद्रा सिंह यांचे पुत्र आहेत. हिमाचल प्रदेशमध्ये राज्यसभेची एक जागा आहे. या निवडणुकीत काँग्रेसच्या आमदारांनी क्रॉस वोटिंग करुन भाजपच्या उमेदवाराला जिंकून आणलं आहे. त्यानंतर भाजपने राज्यामध्ये विश्वासदर्शक ठराव आणण्याची मागणी केली आहे.(Himachal Pradesh Congress leader Vikramaditya Singh quit party)
राज्यसभा निवडणुकीत झालेल्या क्रॉस व्होटिंगनंतर भाजप आणि काँग्रेस दोघांकडे समान आमदारांचे पाठबळ झाल्याचं सांगण्यात येतंय. याप्रकरणी विरोधी पक्षनेते जयराम ठाकूर यांनी राज्यपालांची भेट घेतली आहे. मुख्यमंत्री बदलासाठी सत्ताधारी पक्षाच्या आमदारांचा दबाव वाढला आहे. विक्रमादित्य सिंह यांनी मुख्यमंत्री सुखविंदर सिंग सुक्खू (Sukhvinder Singh Sukhu) यांच्यामुळे क्रॉस वोटिंग झाल्याचा आरोप केला आहे.
विक्रमादित्य सिंह हे प्रदेशातील काँग्रेसमधील बडे नेते आहेत. त्यांच्या राजीनाम्यामुळे काँग्रेस अडचणीत आली आहे. मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली आहे. मंगळवारी विरोधी पक्षनेते जयराम ठाकूर यांच्यासह १५ भाजप आमदारांनी काँग्रेसच्या राज्यसभेतील पराभवानंतर विश्वासदर्शक ठरावाची मागणी केली होती. त्यानंतर त्यांचे निलंबन करण्यात आले होते.
जयराम ठाकूर यांनी माध्यमांशी बोलताना म्हटलं की, भाजपचे उमेदवार हर्ष महाजन विजयी झाले आहेत. त्यामुळे काँग्रेसचा सत्तेत राहण्याचा नैतिक अधिकार राहिलेला नाही. पदाचा राजीनामा दिल्यानंतर विक्रमादित्य म्हणाले की, राज्यसभेत काँग्रेसचा भाजपने पराभव केलाय. मागील वर्षी सरकार स्थापन झाल्यापासून सरकारमध्ये सर्वकाही व्यवस्थित सुरु नाहीये. (Latest Marathi News)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.