पंतप्रधान मोदींच्या सक्षम नेतृत्वाखाली देश एक शक्तिशाली राष्ट्र म्हणून उदयास येत आहे.
Himachal Pradesh Election 2022 : काँग्रेसच्या (Congress) काळात अयोध्येत राम मंदिर (Ayodhya Ram Temple) बांधणं शक्य नव्हतं. देशातील जनतेनं काँग्रेसला पूर्ण संधी दिली. मात्र, काँग्रेस एका कुटुंबापुरती मर्यादित राहिली. भ्रष्टाचाराचे नवे आयाम प्रस्थापित झाले. याची किंमत देशाला चुकवावी लागली, असा आरोप उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांनी केला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सक्षम नेतृत्वाखाली देश एक शक्तिशाली राष्ट्र म्हणून उदयास येत आहे. जागतिक संकटाच्या काळात जग आज मोदींकडं बघत आहे. जगभरात भारताचा झेंडा फडकत आहे. योगी आज (बुधवार) मंडी जिल्ह्यातील सरकाघाट मतदारसंघातील बलदवारा इथं भाजप उमेदवार दलीप ठाकूर यांच्या निवडणूक रॅलीला संबोधित करताना बोलत होते.
योगी म्हणाले, 'स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवात अनेक नवीन योगायोग घडत आहेत. भारतीय वंशाचा नागरिक आज ब्रिटनला विकासाचा मार्ग दाखवत आहे. मोदी सरकारनं 500 वर्षे जुनी गुलामगिरी संपवून अयोध्येत भव्य राम मंदिराचा मार्ग मोकळा केला आहे. काशी विश्वनाथ आणि महाकाल यांचा जीर्णोद्धार करण्यात आला आहे.'
दुहेरी इंजिनच्या सरकारमध्ये हिमाचलचा विकास बुलेट ट्रेनच्या वेगानं झाला आहे. हिमाचलला आपलं घर मानून पंतप्रधान मोदींनी विकासकामं पुढं नेली आहेत. विकासाचा प्रवास कोणत्याही परिस्थितीत थांबता कामा नये. यासाठी जय राम ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली हिमाचलनं एक नवी विकासगाथा लिहिली आहे, असंही योगींनी स्पष्ट केलं.
योगी म्हणाले, मी देवभूमी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या देशाचा मुकुट असलेल्या हिमाचलमध्ये आलो आहे. इथल्या लोकांमध्ये नम्रता आणि शौर्य दिसून येतं. इथल्या तरुणांमध्ये डोंगरासारखी खंबीरता आणि पाण्यासारखी संवेदनशीलता आहे. या दोन्हींच्या मिश्रणाने येथील सैनिक देशाचं रक्षण करताहेत. वन रँक, वन पेन्शन देऊन मोदी सरकारनं सैनिकांना प्रोत्साहन देण्याचं काम केलं आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.