हिमाचलमध्ये काँग्रेसला मोठं यश मिळालं असून इथं काँग्रेस पुन्हा सत्तेत येताना दिसत आहे.
Himachal Pradesh Assembly Election Results 2022 : हिमाचल प्रदेशमध्ये निवडणुकीचे निकाल सातत्यानं समोर येत असून काँग्रेसला इथं मोठं यश मिळालंय. काँग्रेस इथं पुन्हा सत्तेत येताना दिसत आहे.
निवडणूक आयोगाच्या म्हणण्यानुसार, जर ट्रेंडचं आकड्यांमध्ये रूपांतर केलं तर काँग्रेसला हिमाचलमध्ये 40 जागा मिळाल्या आहेत. ज्या बहुमताच्या आकड्यांपेक्षा पाच जागा जास्त आहेत. त्याचवेळी 37 वर्षांची 'प्रथा' मोडण्याचं भाजपचं स्वप्न अधुरंच राहिलेलं दिसतं. या निवडणुकीत भाजपचे सहा मंत्री पराभूत झाल्याचं समजतं.
Lahaul-Spiti Constituency Risult : हिमाचल प्रदेशचे तंत्रशिक्षण मंत्री राम लाल मार्कंडा लाहौल-स्पिती विधानसभा मतदारसंघातून पराभूत झाले आहेत. त्यांचा काँग्रेसच्या रवी ठाकूर यांनी 1,676 मतांनी पराभव केला. काँग्रेसच्या उमेदवाराला 9,734 मतं मिळाली. तर, मार्कंडा यांना केवळ 8,058 मतं मिळाली आहेत.
Manali Constituency Risult : शिक्षणमंत्री गोविंद सिंह ठाकूर हे हिमाचल प्रदेशच्या मनाली विधानसभा मतदारसंघातून पिछाडीवर आहेत. मतमोजणीत दुपारी 2 वाजेपर्यंत काँग्रेसचे उमेदवार भुवनेश्वर गौर यांना 29,331 मतं मिळाली आहेत. तर, भाजपचे गोविंदसिंह ठाकूर यांना 26,468 मतं मिळाली. म्हणजेच, गोविंद ठाकूर 2863 मतांनी पिछाडीवर आहेत.
Shahpur Assembly Constituency Risult : शाहपूर मतदारसंघातून भाजपचे उमेदवार आणि सामाजिक न्याय मंत्री सरवीन चौधरी यांचा मोठ्या फरकानं पराभव झाला आहे. त्यांचा काँग्रेसचे उमेदवार केवल सिंह यांनी 11931 मतांनी पराभव केला. सरवीन यांना एकूण 23,931 मतं मिळाली. केवल सिंह यांना 35,862 मतं मिळाली आहेत.
Kasauli Constituency Risult : हिमाचलमधील कसौली विधानसभा मतदारसंघातून आरोग्य मंत्री राजीव सैजल यांचा पराभव झाला आहे. त्यांचा काँग्रेसच्या विनोद सुलतानपुरी यांनी 6 हजार 500 हून अधिक मतांनी पराभव केला. राजीव यांना 20,930 मतं मिळाली. तर, काँग्रेसचे उमेदवार सुलतानपुरी यांना 27,377 मतं मिळाली आहेत.
Kutlehar Constituency Risult : ग्रामीण विकास आणि पंचायत राज मंत्री के वीरेंद्र कंवर यांचा कुटलेहार विधानसभा मतदारसंघातून काँग्रेस उमेदवार दविंदर कुमार यांनी 7 हजारांहून अधिक मतांनी पराभव केला आहे. कंवर यांना एकूण 27125 मतं मिळाली. तर दविंदर कुमार यांना 34240 मतं मिळाली आहेत.
Ghumarwin Assembly Seat Result : दुसरीकडं अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक व्यवहार मंत्री राजिंदर गर्ग हेही घुमारवी जागेवरून 5 हजारांहून अधिक मतांनी पिछाडीवर आहेत. निवडणूक आयोगानं दिलेल्या माहितीनुसार, दुपारी 3 वाजेपर्यंत राजिंदर गर्ग यांना 28843 मतं मिळाली आहेत, तर काँग्रेसचे उमेदवार राजेश धर्मानी यांना 34019 मतं मिळाली आहेत. दोघांमध्ये 5000 हून अधिक मतांचा फरक आहे. इथंही काँग्रेसचा विजय निश्चित मानला जात आहे.
विशेष म्हणजे, हिमाचल प्रदेशात 1985 पासून कोणत्याही पक्षाचं सरकार पुनरावृत्ती करू शकलेलं नाही. ही प्रथा मोडून दुसऱ्यांदा सरकार स्थापन करण्याचा दावा भाजप करत होतं. हिमाचल निवडणुकीच्या प्रचारात भाजपचा एकच नारा होता की 'राज नहीं, रिवाज बदलेगा'. वास्तविक उत्तर प्रदेश, उत्तराखंड आणि गोव्यात सत्ताविरोधी घटकाचा पराभव करून भाजपनं सलग दुसऱ्यांदा सरकार स्थापन केलं आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.