नवी दिल्ली : हिमाचल प्रदेशातील किनौर येथे भूस्खलनामुळं मृत्यूमुखी पडलेल्या ९ जणांच्या कुटुंबियांना पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून २ लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. तर जखमींना ५०,००० रुपयांची मदत देण्यात येणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ही घोषणा केली. तसेच ट्वीट करुन मृतांच्या कुटुंबियांचे सांत्वन केले. (Himachal Pradesh landslide PM announces Rs 2 lakh aid from PMNRF aau85)
पंतप्रधानांनी ट्वीट करुन म्हटलं, "हिमाचल प्रदेशातील किनौर येथे झालेल्या भूस्खलनाची दुर्घटना अत्यंत दुःखद आहे. यामध्ये जीव गमावलेल्या लोकांच्या नातेवाईकांप्रती मी संवेदना व्यक्त करतो. या दुर्घटनेत जखमी झालेल्या लोकांच्या उपाचारांची संपूर्ण व्यवस्था केली जात आहे. ते लवकरात लवकर बरे होवोत अशी प्रार्थना करतो"
हिमाचल प्रदेशातील किनौर जिल्ह्यात भूस्खलनाच्या तावडीत सापडल्यानं नऊ लोकांचा मृत्यू झाला आहे तर तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. दरड कोसळल्याने दिल्ली आणि चंदीगडहून हिमाचल प्रदेशात फिरायला आलेल्या प्रवाशांच्या वाहनावर दगड कोसळले. यामुळे गंभीर जखमी होऊन त्यांना जीव गमवावा लागला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.