Himachal Pradesh : हिमाचल प्रदेशमध्ये 'मिशन कमळ'ला थोपवण्यात प्रियांका गांधींची महत्त्वाची भूमिका; 'ही' रणनीती ठरली यशस्वी

Priyanka Gandhi : हिमाचल प्रदेशात राज्यसभा निवडणुकीदरम्यान विरोधी भाजपच्या उमेदवाराला मतदान करणाऱ्या काँग्रेसच्या सहा आमदारांना विधानसभेचे अध्यक्ष कुलदीपसिंह पठानिया यांनी गुरुवारी निलंबित केले.
Himachal Pradesh
Himachal Pradeshesakal
Updated on

Himachal Pradesh Politics (Marathi News) : हिमाचल प्रदेशात राज्यसभा निवडणुकीदरम्यान विरोधी भाजपच्या उमेदवाराला मतदान करणाऱ्या काँग्रेसच्या सहा आमदारांना विधानसभेचे अध्यक्ष कुलदीपसिंह पठानिया यांनी गुरुवारी निलंबित केले. पक्षाचा व्हिप झुगारून हे सहा आमदार विधिमंडळामध्ये अर्थसंकल्प मंजूर होत असताना देखील अनुपस्थित राहिले होते. यामुळेच त्यांना निलंबित केले जावे, अशी मागणी सत्ताधारी काँग्रेसकडून करण्यात आली होती.

Priyanka Gandhi News

राजिंदर राणा, सुधीर शर्मा, इंदरदत्त लखनपाल, देविंदरकुमार भुत्तो, रवी ठाकूर आणि चैतन्य शर्मा अशी निलंबित करण्यात आलेल्या आमदारांची नावे आहेत. विधानसभाध्यक्षांच्या निर्णयाविरोधात निलंबित आमदारांनी उच्च न्यायालयामध्ये धाव घेतली आहे. या आमदारांवरील निलंबनाच्या कारवाईमुळे आता सभागृहातील सदस्यांची संख्या ६८ वरून ६२ पर्यंत आली असून काँग्रेसची सदस्य संख्या ४० वरून ३४ वर झाली आहे. या आमदारांनी पक्षाचा आदेश झुगारून लावल्याने त्यांना पक्षांतरबंदी कायद्यान्वये निलंबित करण्यात आले असल्याचे विधानसभाध्यक्षांकडून सांगण्यात आले.

Himachal Pradesh
Shraddha Walkar : श्रद्धा वालकर प्रकरणात 'लव्ह जिहाद' असल्याची बतावणी करणाऱ्या न्यूज चॅनेलवर कारवाई

प्रियांका गांधींनी आखली रणनीती

हिमाचल प्रदेशातील ‘मिशन कमळ’ ला थोपविण्यामध्ये काँग्रेसच्या नेत्या प्रियांका गांधी-वद्रा यांची भूमिका महत्त्वाची ठरली. भाजपकडून फोडाफोडीचे राजकारण सुरू झाल्यानंतर प्रियांका या काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, मुख्यमंत्री सुखविंदरसिंह सुक्खू आणि अन्य वरिष्ठ नेत्यांच्या संपर्कात होत्या. राज्यसभा निवडणुकीच्यावेळी मते फुटल्याने पक्षश्रेष्ठीही सावध झाले होते, त्यांनी वेळेतच बंडाच्या तयारीत असलेल्या अन्य आमदारांना रोखले. प्रियांका यांच्या सांगण्यावरूनच भूपिंदरसिंह हुडा, डी.के.शिवकुमार आणि भूपेश बघेल या निरीक्षकांना राज्यामध्ये पाठविण्यात आल्याचे समजते.

Himachal Pradesh
Indians Trapped In Russia: नोकरीच्या बहाण्याने बोलावलं अन् युद्धाचं काम दिलं, 20 भारतीय अजूनही रशियात; केंद्र सरकार काय कारवाई करणार?

प्रदेशपातळीवरील मतभेद संपले

हिमाचल प्रदेशात काँग्रेसश्रेष्ठींना प्रदेश पातळीवरील पक्षांतर्गत मतभेद दूर करण्यात यश आले असून गुरुवारी प्रदेशाध्यक्ष प्रतिभासिंह आणि मुख्यमंत्री सुखविंदरसिंह सुक्खू हे एकत्र दिसून आले. दोघाजणांनी संयुक्त पत्रकार परिषदेमध्ये एकत्रितपणे निवडणूक लढण्याची घोषणा केली. यावेळी सहा सदस्यांची एक समन्वय समिती तयार करण्याचीही घोषणा करण्यात आली. राज्याची धुरा सुक्खू यांच्याकडेच राहील, असे डी.के.शिवकुमार यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.