नवी दिल्ली- आसामचे (Assam) नवे मुख्यमंत्री म्हणून हिमंता बिस्व शर्मा (Himanta Biswa Sarma) शपथ घेणार आहे. सोमवारी त्यांचा शपथविधी सोहळा पार पडेल. आसामचे नवे मुख्यमंत्री (next Assam chief minister) कोण होणार याबाबत बऱ्याच चर्चा घडून येत होत्या. सर्बानंद सोनावाल (sarbanad sonowal) यांना पुन्हा मुख्यमंत्रीपदाची संधी मिळणार की हिमंता बिस्व शर्मा यांच्या गळ्यात मुख्यमंत्रीपदाची माळ पडणार याबाबत भाजपमध्ये बराच विचारविमर्श घडून आला. अखेर हिमंता बिस्व शर्मा यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आली आहे. सोमवारी ते मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतील. नव्याने निवडून आलेल्या विधानसभा सदस्यांच्या गुवाहाटी येथे झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. (Himanta Biswa Sarma to be next Assam chief minister sarbanad sonowal)
सर्बानंद सोनोवाल यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला असून हिमंता बिस्व शर्मा यांना वाट मोकळी करुन दिली आहे. १२६ जागांच्या विधानसभेमध्ये भाजपला ६० जागा मिळवता आल्या. सहयोगी पक्ष आसाम गण परिषदने १० जागा आणि यूनायटेड पीपल्स पार्टीने ६ जागा जिंकल्या. सहयोगी पक्षांच्या मदतीने भाजपने बहुमताचा आकडा पार केला आहे. त्यामुळे राज्यात भाजप पुन्हा सरकार स्थापन करत आहे. हिमंता बिस्व शर्मा आणि सर्बानंद सोनावाल या दोन्ही नेत्यांनी दिल्लीत जाऊन भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची भेट घेतली होती.
२०१६ च्या निवडणुकीआधी काँग्रेसमधून भाजपवासी झालेले बिस्व शर्मा यांना, पाच वर्षे थांबा पाच वर्षे थांबा असे म्हणून त्यावेळी भाजप नेतृत्वाने थोपवून धरले होते. पण, या निवडणुकीआधीच त्यांनी स्वतःला मुख्यमंत्रिपदाचे दावेदार म्हणून प्रोजेक्ट करण्यास सुरवात केली होती आणि त्यासाठी त्यांना भाजपच्या सध्याच्या प्रथेप्रमाणे दिल्लीकडून हिरवा कंदील मिळवण्याचीही गरज वाटली नव्हती हे लक्षणीय.बिस्व शर्मा यांची प्रशासनावरील आणि पक्षाच्या आमदारांवरील पकड यामुळे त्यांचे उपद्रवमूल्य वाढल्याने भाजपच्या सर्वेसर्वा नेतृत्वाला आसामचा पेच हलक्या हाताने सोडवावा लागण्याची आवश्यकता भासू लागली होती.
बिस्व यांच्या जमेच्या बाजू
एनसीआर, सीसीए, कोरोना संसर्ग, घुसखोरांचा प्रश्न, वाढती बेरोजगारी अशा जटिल प्रश्नांच्या काळातही सोनोवाल यांनी संतुलितपणे मार्ग काढला. यातील कोरोना संसर्ग निर्मूलन वगळता बिस्व शर्मा यांच्याकडे बाकी एकही जबाबदारी थेटपणे नव्हती. गृहमंत्री अमित शहा यांचे निकटवर्तीय मानले जाणारे आणि पक्षाला वाढता जनाधार मिळवून देणारे बिस्व शर्मा हे वरच्या पट्टीत बोलून मुख्यमंत्रिपदासाठी स्वतःची दावेदारी सांगत होते. कोरोनाला रोखण्यात आसामने लक्षणीय यश मिळवले हाही बिस्व शर्मा यांच्यासाठी बेरजेचा मुद्दा आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.