SEBI on Adani Group:हिंडेनबर्ग रिपोर्ट बाहेर आल्यानंतर अदानी समुहाबद्दल अनेक प्रश्नचिन्ह निर्माण करण्यात आले. अदानी समुहावर लागलेल्या आरोपांचा मागच्या काही महिन्यापासू सेबी तपास करत आहे. आता सेबीने अदानी समुह आणि व्हर्जिन आयलंडचे फंड्सदेखील आपल्या तपासच्या कार्यक्षेत्रात घेतले आहेत. या फंड्सच नाव 'गल्फ आशिया अँड इन्वेस्टमेंट' असं आहे.
रॉयटर्स या वृ्त्तसंस्थेने आपल्या सुत्रांच्या हवाल्याने सांगितले की सेबीकडून अदानी समुह आणि गल्फ आशिया अँड इन्वेस्टमेंटचा तपास करण्यात येत आहे. मागच्या महिन्यात या फंडच्या वेबसाईटवर असं सांगण्यात आलं होतं की याची मालकी दुबईचे व्यावसायिक नासिर अली शाबान अहली यांच्याकडे आहे.
मात्र, आता ही वेबसाईट हटवण्यात आली आहे. शोध पत्रकरितेच्या ग्लोबल नेटवर्क ऑर्गनाइझ्ड क्राईम अँड करप्शन रिपोर्टिंग प्रोजेक्ट या संस्थेकडून रॉयटर्सला अशी माहिती देण्यात आली की फंडकडून अदानी समुहाच्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक करण्यात आली. या फंडमागे नेमकं कोण आहे आणि अदानी समुहाचा याच्याशी काय संबंध आहे, याचा तपास सेबी करत आहे.
हिंडनबर्गने लावले होते आरोप
जानेवारी महिन्यात अमेरिकेची शॉर्ट सेलिंग फर्म हिंडेनबर्गने अदानी समुहावर अनेक गंभीर आरोप लावले होते. त्यांना आरोप केला होता की अदानी समुहाच्या शेअर्सच्या मुल्यांकनामध्ये गडबड आहे. त्याचबरोबर त्यांच्या शेल कंपन्यांच्या माध्यमातून आपल्या लिस्टेड कंपन्यांमध्ये पैसा लावला जात आहे. या सर्व आरोपांबाबत अदानी समुहाने अनेक वेळा स्पष्टीकरण दिलं आहे.
हिंडेनबर्गने केलेल्या या आरोपांमुळे अदानी समुहांच्या शेअर्समध्ये आणि गौतम अदानी यांच्या वैयक्तिक संपत्तीमध्ये मोठ्या प्रमाणात घसरण झाली होती. ज्यामुळे शेअर मार्केटमध्ये देखील अस्थिरता बघायला मिळाली. हे प्रकरण जेव्हा सुप्रीम कोर्टात गेलं तेव्हा कोर्टाने सेबीला या आरोपांची चौकशी कऱण्याचे आदेश दिले. (Latest Marathi News)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.