Hindi Diwas : भारताव्यतिरिक्त या ठिकाणीही हिंदी भाषा बोलली जाते

सध्या भारतातील सुमारे ४३.६३ टक्के लोक हिंदी बोलतात
Hindi Diwas
Hindi Diwas esakal
Updated on

आज १४ सप्टेंबर हा दिवस भारतात हिंदी दिवस म्हणून साजरा केला जातो. हिंदी ही आपली राष्ट्रभाषा आहे. आणि त्याच बरोबरीने जगातील चौथी सर्वाधिक बोलली जाणारी भाषा आहे. अलीकडील आकडेवारीनुसार, सध्या भारतातील सुमारे ४३.६३ टक्के लोक हिंदी बोलतात. पण तुम्हाला माहिती आहे का की भारताशिवाय इतरही अनेक देश आहेत जिथे हिंदी बोलली जाते.या खास प्रसंगी भारताव्यतिरिक्त कोणत्या देशात हिंदी भाषा बोलली जाते ह्याची यादी.

या यादीत कोणत्या देशांचा समावेश आहे ते जाणून घेऊया.

१. नेपाळ

नेपाळमध्ये हिंदी भाषिक लोकही मोठ्या संख्येने आहेत. तुम्ही इथे लोकांशी तुमच्या भाषेत बोलू शकता. बॉलीवूड चित्रपटही इथे बघायला मिळतात.

२. मॉरिशस

मॉरिशस हे हिंदी महासागरात स्थित एक बेट आहे. जिथे मोठ्या संख्येने भारतीय राहतात. या देशातही तुम्हाला हिंदी भाषिक लोक सापडतील. मॉरिशस हे उत्तम पर्यटन स्थळ आहे.

३. फिजी

फिजीमध्येही हिंदी भाषिकांची संख्या मोठी आहे. फिजी हा अनेक बेटांनी बनलेला देश आहे. जिथे मोठ्या संख्येने भारतीय राहतात. पर्यटनासाठीही हे ठिकाण खूप चांगले आहे.

४. पाकिस्तान

स्वातंत्र्यापूर्वी पाकिस्तान हा भारताचा भाग होता. त्यामुळे येथील लोक हिंदी भाषा चांगल्या प्रकारे समजतात आणि बोलतात. याशिवाय पंजाबी, सिंधी, पश्तो, बलुची या भाषा बोलणारे लोकही येथे राहतात.

Hindi Diwas
Hindi in America : अमेरिकेतील शाळांमध्ये शिकवली जाणार हिंदी भाषा; १०० हून अधिक लोकप्रतिनिधींचा बायडेन यांना प्रस्ताव

५. सिंगापूर

सिंगापूरमध्येही भारतीय वंशाचे लोक मोठ्या संख्येने राहतात. ज्यांना हिंदी भाषा चांगली समजते आणि बोलता येते. सिंगापूर हे एक प्रमुख पर्यटन स्थळही आहे.

६. त्रिनिदाद आणि टोबॅगो

इंग्रजी ही त्रिनिदाद आणि टोबॅगोची अधिकृत भाषा असली तरी इथे स्पॅनिश, फ्रेंच, हिंदी आणि भोजपुरीही याही भाषा बोलल्या जातात.

Hindi Diwas
Hindi Diwas : का साजरा केला जातो हिंदी दिवस? जाणून घ्या या दिवसाबाबतच्या रंजक गोष्टी

७. बांगलादेश

बंगाली इथली अधिकृत भाषा असली तरी.म इथे इंग्रजीसोबतच हिंदीही बोलली जाते.तर हे असे देश आहेत जिथे हिंदी भाषिकांची संख्याही लक्षणीय आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.