Hindi Diwas : आज १४ सप्टेंबर म्हणजेच हिंदी दिवस. अधिकृतरित्या पहिला हिंदी दिवस हा १४ सप्टेंबर १९५३ रोजी साजरा करण्यात आला. मँडरीन आणि इंग्रजीनंतर हिंदी ही जागतिक स्तरावर तिसरी सर्वाधिक बोलली जाणारी भाषा आहे. २०२१ च्या जनगणनेनुसार हिंदी भाषा बोलणाऱ्या लोकांची संख्या ४३. ६ टक्के आहे. हिंदी शब्द हा 'हिंद' या पर्शियन शब्दापासून निर्माण झाला.
संपूर्ण जगाचा विचार केला तर संपूर्ण जगात ४२५ मिलियन लोक पहिली भाषा म्हणून हिंदी भाषा बोलतात तर १२० मिलियन लोक मातृभाषेनंतर हिंदी भाषा बोलणारे आहेत. संपूर्ण भारतात बोलली जाणारी हिंदी ही पहिली अधिकृत भाषा असून दुसरी अधिकृत भाषा इंग्रजी आहे.
दुसऱ्या युरोपियन देशांतील भाषेप्रमाणेच हिंदीसुद्धा डावीकडून उजवीकडे लिहीली जाते. हिंदी दिवसानिमित्त देशभरात अनेक कार्यक्रम आयोजित केले जातात. शिवाय या दिवशी पुरस्कारसुद्धा प्रदान केले जातात. उदा. राजभाषा किर्ती पुरस्कार आणि राजभाषा गौरव पुरस्कार हिंदी दिवसाच्या दिवशी मंत्रालय, विविध विभागांत आणि सार्वजनिक क्षेत्रांत राष्ट्रिय अधिकृत बँका आणि नागरिकांना त्यांच्या कार्यातील योगदानासाठी आणि हिंदी भाषेचे महत्व वाढवण्यासाठी हे पुरस्कार प्रदान केल्या जातात.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.