गुवाहाटी : हिंदू-मुस्लीम आंतरधर्मीय विवाहासंदर्भात 'लव्ह जिहाद' हा कथीत प्रकार सध्या देशभरात चर्चेत आहे. यामध्ये आता आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्व सरमा यांनी नवा मुद्दा उपस्थित केला आहे. हिंदू मुलानं हिंदू मुलीला फसवणं हा प्रकारही 'जिहाद'च असतो असं त्यांनी म्हटलं आहे. हे प्रकार रोखण्यासाठी आम्ही नवा कायदा आणणार आहोत, असंही त्यांनी म्हटलं आहे. 'लव्ह जिहाद'ची आणखी वेगळी कल्पना मांडल्यानं सध्या सरमा चर्चेत आहेत. (Hindu boy lying to Hindu girl for marriage is also Jihad says Assam CM)
आसाममध्ये भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी सरकारला दोन महिने पूर्ण झाल्याबद्दल पत्रकार परिषदेचं आयोजन केलं होतं. यामध्ये बोलताना मुख्यमंत्री हिमंत सरमा म्हणाले, "हिंदुत्वाची सुरुवात ५,००० वर्षांपूर्वी झाली. हिंदुत्व जीवन जगण्याचा एक भाग बनलं आहे त्यामुळे मी किंवा इतर कोणीही याला थांबवलं जाऊ शकत नाही. जवळपास आपण सर्वच जण हिंदूंचेच वंशज आहोत."
दरम्यान, 'लव्ह जिहाद'च्या मुद्द्यावर विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देताना सरमा म्हणाले, "आपल्याला या शब्दावर आक्षेप आहे. पण कोणालाही कोणत्याही महिलेला फसवण्याची परवानगी नाही. त्यामुळे हिंदू मुलाचं हिंदू मुलीशी खोटं बोलणं तिला फसवणं हे देखील जिहादचं आहे. आम्ही याविरोधात कायदा आणणार आहोत. आमचं सरकार महिलांची फसवणूक करणाऱ्याला सहन करणार नाही. मग ती व्यक्ती हिंदू असेल किंवा मुस्लीम. आमच्या बहिणींच्या सुरक्षेसाठी अशा आरोपींविरोधात योग्य कारवाई केली जाईल."
आमदार आणि मंत्री यांसदर्भात सरमा यांच्या एका विधानावर विरोधकांकडून टीका होत आहे. याबाबत बोलताना मुख्यमंत्री सरमा म्हणाले, "आमदार कायदे बनवण्यासाठी आहेत. तर मंत्री मतदारसंघांचा विकास करण्यासाठी जबाबदार आहेत. भारताचं संविधानं हेच सांगतं, त्यामुळे विधानसभेत आमदार हे मंत्र्यांपेक्षा मोठे असतात."
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.