लखनऊ- अलाहाबाद हायकोर्टाने लिव्ह-इन-रिलेशनशिपबाबत महत्त्वाची टिप्पणी केली आहे. वेगवेगळ्या धर्माचे प्रेमी युगल धर्म परिवर्तनाशिवाय लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहू शकत नाही. धर्मपरिवर्तनाशिवाय तरुण-तरुणी एकत्र राहत असतील तर ते बेकायदेशीर असेल असं हायकोर्टाने म्हटलं आहे. (Hindu Muslim couple living in live in relationship illegal said allahabad High Court)
दोन वेगळ्या धर्मातील लोकांना एकत्र राहण्यासाठी आता कायदेशीर परवानगी घ्यावी लागेल का? असा प्रश्न विचारला जात आहे. अलाहाबाद हायकोर्टाने लिव्ह-इन-रिलेशनशिपबाबत केलेल्या टिप्पणीमुळे पुन्हा चर्चांना तोंड फुटलं आहे. एका प्रेमी युगलाने संरक्षण मिळावे यासाठी हायकोर्टात याचिका दाखल केली होती. न्यायमूर्ती रेनू अग्रवाल यांच्या एकल खंडपीठाने यावर सुनावणी घेतली. (Law News for Couple)
उत्तर प्रदेशातील धर्मांतरणाच्या कायद्याच्या संदर्भात हायकोर्टाने हा निर्णय दिला आहे. न्यायमूर्ती म्हणाले की, धर्मांतरण केवळ लग्नासाठी आवश्यक नाही, तर विवाहाशी साधर्म्य दाखवणाऱ्या प्रत्येक संबंधासाठी ते आवश्यक आहे. त्यामुळेच लिव्ह-इन-शिवाय प्रेमी युगलाने एकत्र राहणे बेकायदेशीर आहे. कोर्टाने तरुण-तरुणीची याचिका फेटाळून लावली आहे.
प्रेमी युगलाने संरक्षण मिळावे यासाठी कोर्टात धाव घेतली होती. मुलगा हिंदू धर्माचा होता तर मुलगी मुस्लीम धर्मातील होते. दोघे उत्तर प्रदेशातील कासिगंज येथील रहिवासी आहेत. प्रेमी युगलाचे म्हणणे होते की, त्यांनी कोर्ट मॅरेजसाठी अर्ज केला आहे. पण, त्यासाठी वेळ लागत आहे. तोपर्यंत आम्हाला संरक्षण पुरवलं जावं. कारण, त्यांच्यासोबत काही अघटित होण्याची शक्यता आहे.
प्रेमी युगलाच्या विरोधात बाजू मांडणारे वकील म्हणाले की, प्रेमी युगलाने धर्मांतरणाच्या कलम ८ आणि ९ नुसार धर्मपरिवर्तनासाठी अर्ज केलेला नाही. त्यामुळे त्यांचे एकत्र राहणे बेकायदेशीर आहे. दोन्ही बाजू ऐकून घेतलयानंतर हायकोर्टाने प्रेमी युगलाच्या विरोधात निर्णय दिला आहे. दरम्यान, भारतामध्ये लिव्ह-इन-रिलेशनशिपबाबत कोणतीही व्याख्या स्पष्ट नाही. साधारणपणे, जेव्हा एखादे प्रेमी युगल लग्न न करता पती-पत्नीसारखं एकत्र राहते त्याला लिव्ह-इन-रिलेशनशिप म्हटलं जातं. (Latest Marathi News)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.