Crime News : 60 वर्षाच्या साधूची हत्या करून मृतदेहाचे केले तुकडे; साधूनं मुस्लिम धर्म सोडून स्वीकारला होता हिंदू धर्म

मयत साधूनं मुस्लिम धर्म सोडून हिंदू धर्म स्वीकारला होता.
Rajasthan crime news
Rajasthan crime newsesakal
Updated on
Summary

मयत साधूनं मुस्लिम धर्म सोडून हिंदू धर्म स्वीकारला होता.

राजस्थानच्या धौलपूर जिल्ह्यातील (Rajasthan Dholpur) नदीपात्रात एका साधूचा मृतदेह सापडल्याची धक्कादायक घटना समोर आलीये. मिळालेल्या माहितीनुसार, आज (बुधवार) सकाळी कांचनपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बामणी जंगलात नदीच्या काठावर 60 वर्षीय बहाबुद्दीन खान यांचा मृतदेह आढळून आल्यानं खळबळ उडाली.

Rajasthan crime news
Shashi Tharoor : काँग्रेसच्या शशी थरूरांना झालंय तरी काय? व्हीलचेअरवर बसून गाठलं संसद भवन!

साधूची हत्या करुन त्यांच्या मृतदेहाचे तुकडे पोत्यांत भरले होते. मृत साधू भीमगढ गावचा रहिवासी आहे. गेल्या 10 वर्षांपासून तोंत्री गावातील मातेच्या मंदिरात तो पूजा करत होता. घटनेची माहिती मिळताच कांचनपूर पोलीस स्टेशन घटनास्थळी दाखल झालं असून माहिती गोळा करत आहे. त्याचबरोबर एफएसएलच्या पथकालाही घटनास्थळी पाचारण करण्यात आलं आहे.

Rajasthan crime news
Delhi High Court : मुलांवर लैंगिक अत्याचाराचा परिणाम भयानक असू शकतो; High Court चं महत्वाचं विधान

दरम्यान, मयत साधूनं मुस्लिम धर्म सोडून हिंदू धर्म स्वीकारला होता आणि गेल्या 10 वर्षांपासून तो चामुंडा मातेच्या मंदिरात वास्तव्यास होता. इथं नमाज पठण करण्याबरोबरच मंदिराची देखभालही करत होता, अशी माहिती मिळालीये. घटनेनुसार, आज सकाळी स्थानिक ग्रामस्थांनी रक्तानं माखलेल्या अवस्थेत चार गोण्यांमध्ये एक मृतदेह पाहिला. त्यानंतर परिसरात खळबळ उडाली. यानंतर गावकऱ्यांचा मोठा जमाव जमला आणि पोलिसांना माहिती देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह ताब्यात घेतला आहे. सध्या तरी पोलिसांना कोणताही सुगावा लागलेला नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.