Hinduja Group: अशोक लेलँडचे चेअरमन एसपी हिंदुजा यांचे निधन, ८७ व्या वर्षी लंडनमध्ये घेतला अखेरचा श्वास

sp Hinduja
sp Hinduja
Updated on

चार हिंदुजा बंधूंपैकी ज्येष्ठ आणि हिंदुजा समूहाचे अध्यक्ष श्रीचंद परमानंद हिंदुजा यांचे आज (बुधवार) लंडनमध्ये निधन झाले. काही दिवसांपासून त्यांची तब्येत खराब होती. ते 87 वर्षांचे होते.

हिंदुजा कुटुंबाने एका निवेदनात म्हटले आहे की, "आज आमचे कुटुंबीय आणि हिंदुजा समुहाचे अध्यक्ष एसपी हिंदुजा यांचे निधन झाले. संपूर्ण हिंदुजा कुटुंबाला अतिशय दुःख होत आहे. ते कुटुंबाचे गुरू होते.

हिंदुजा समूह हे ब्रिटनमधील सर्वात श्रीमंत व्यावसायिक घराण्यांपैकी एक आहे. 1971 मध्ये परमानंद हिंदुजा यांच्या निधनानंतर त्यांच्या मुलांनी कौटुंबिक वारसा हाती घेतला. अशोक लेलँड, गल्फ ऑइल, हिंदुजा बँक स्वित्झर्लंड, इंडसइंड बँक, हिंदुजा ग्लोबल सोल्युशन्स, हिंदुजा टीएमटी, हिंदुजा व्हेंचर्स, इंडसइंड मीडिया आणि कम्युनिकेशन्स लिमिटेड या त्यांच्या प्रमुख कंपन्या आहेत.

sp Hinduja
Viral Video : गाडीवरून जाताना डोक्यात पडला नारळ अन्...; व्हिडिओ पाहून हेल्मेटचं महत्त्व कळेल

बोफोर्स घोटाळ्यात आले होते नाव -

1952 मध्ये शिक्षण पूर्ण केल्यानंतर एसपी हिंदुजा आपल्या वडिलांसोबत कौटुंबिक व्यवसायात सामील झाले. त्यांचे भाऊ गोपीचंद, प्रकाश आणि अशोक हिंदुजा यांच्यासोबत त्यांनी व्यवसाय सांभाळला. 80 च्या दशकात बोफोर्स घोटाळ्यात त्यांचे नाव ठळकपणे समोर आले होते.

sp Hinduja
Pradeep Kurulkar Polygrphy Test : का केली जाते गुन्हेगारांची पाॅलिग्राॅफी टेस्ट?

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.