नवी दिल्ली : रामायण सर्वांनीच ऐकलेलं तसेच पाहिलेलं आहे. रामायण कथेतील महत्त्वाचा भाग असणारा रामसेतू सध्या चर्चेत आहे. रामसेतूला ऐतिहिसाक स्मारक घोषित करण्याची मागणी सुप्रीम कोर्टामध्ये करण्यात आली आहे. यावरुन आता कोर्टात एक याचिका दाखल करण्यात आली आहे. या याचिकेवर सुनावणी करताना सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारकडून त्यांचं मत मागवलं आहे.
सुप्रीम कोर्टाने भाजपचे खासदार सुब्रमण्यम स्वामी यांच्याद्वारे दाखल करण्यात आलेल्या याचिकेवरुन केंद्र सरकारला उत्तर मागत सुनावणीसाठी पुढील 9 मार्चची तारीख निश्चित केली आहे. स्वामी यांनी याआधी 2020 मध्ये रामसेतूला ऐतिहासिक स्मारकाचा दर्जा द्यावा, यासाठीच्या याचिकेवर लवकरात लवकर सुनावणी करण्याची मागणी केली होती. त्यावेळी कोर्टाने यावर नंतर विचार करु, असं म्हटलं होतं.
सुप्रीम कोर्टाने त्यावेळी देखील केंद्र सरकारला या प्रकरणी प्रतिज्ञापत्र दाखल करण्यास सांगितलं होतं. सुब्रमण्यम स्वामी यांनी 2018 मध्ये ही याचिका सुप्रीम कोर्टामध्ये दाखल केली होती. त्यांनी रामसेतूला राष्ट्रीय वारसा घोषित करण्याची मागणी केली होती.
वानरांनी बनवला होता रामसेतू?
हिंदू धर्मामधील एक पवित्र ग्रंथ रामायणमध्ये म्हटलंय की, 'वानर सेने'च्या मदतीने श्रीराम लंकेमध्ये पोहोचले होते. त्यावेळी मधला समुद्र पार करण्यासाठी वानर सेनेने हा रामसेतू बांधला असल्याचं सांगितलं जातं. या दगडांवर 'श्रीराम' लिहून पाण्यात टाकल्याने ती तरंगू लागली आणि त्या माध्यमातून पूल साकारण्यात आला. मात्र, 2007 मध्ये एएसआयने म्हटलं होतं की, याबाबतचा कोणताही पुरावा उपलब्ध नाहीये. रामसेतू आणि त्याच्या आसपासच्या भागाची प्रकृती आमि पाण्याखालील पुरातात्विक घटकांचा अभ्यास करण्यासाठी प्रस्ताव दिला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.